शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यासाठी आता राज्यात ‘मॉडेल रेड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 11:29 AM

हातभट्टीवर रेड करताना आता परंपरागत पद्धतीला मूठमाती दिली जाणार आहे. आता ही कारवाई दोन सरकारी पंचांसमक्ष करणे बंधनकारक आहे.

ठळक मुद्देमहासंचालकांचे आदेशशिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी सुधारणा

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पोलिसांकडून हातभट्ट््यांवर धाड टाकून कारवाई केली जाते. मात्र नंतर ती केस न्यायालत टिकत नाही. परिणामी आत्तापर्यंत झालेल्या दहा हजार रेडमध्ये एकाही आरोपीला न्यायालयात शिक्षा झाली नाही. नुसती रेड करून चालणार नाही, तर ती केस न्यायालयातही टिकावी, याासठी पोलीस महासंचालकांनी ‘हातभट्टी रेड’करिता स्वतंत्र निर्देश दिले आहेत.हातभट्टीवर रेड करताना आता परंपरागत पद्धतीला मूठमाती दिली जाणार आहे. आता ही कारवाई दोन सरकारी पंचांसमक्ष करणे बंधनकारक आहे. शिवाय संपूर्ण प्रक्रिया इन कॅमेरा करून मोहामाच, दारूचे नमुने तत्काळ घेऊन ते जागीच इन कॅमेरा सिल करण्याचे निर्देश आहेत. जप्त केलेले नमुने २४ तासांच्या आत विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठविण्याचा अल्टीमेटमही देण्यात आला आहे.दारू भट्टीवर रेड केल्यानंतर १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र तयार करण्याचा अवधी दिला. रेड करताना उपस्थित असलेल्यांचा आता प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून जबाब नोंदविला जाणार आहे. साक्षीदारांची संख्या जेवढी जास्त, तेवढे उत्तम, असेही या मॉडेल रेडच्या मॅन्युअलमध्ये नमूद आहे. दारू गाळप करणाऱ्यांची कोणत्याही परिस्थितीत न्यायालयातून सुटका होऊ नये, अशा पद्धतीने दोषारोप पत्र तयार करावेत, असे निर्देश आहेत.धाडी किती टाकल्या, यापेक्षा कोर्टात किती टिकल्या व शिक्षा झाली, याचे आता स्वतंत्रपणे मूल्यमापन केले जाणार आहे.

आरोपींविरूद्ध ‘एमपीडीए’चा प्रस्तावहीआत्तापर्यंत मटका, जुगार आणि हातभट्टी रेड, हा केवळ सोपस्कार म्हणून पूर्ण केला जात होता. आता संबंधित जमादार अथवा पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. इतर गुन्ह्याप्रमाणे हातभट्टीवरील कारवाईचे मूल्याकंन आता गुन्हे सिद्धवरून ठरणार आहे. त्यामुळे सर्व ठाणेदारांनी आता हातभट्टी मॉडेल रेड करण्यासाठी अधिनस्थ यंत्रणेला कामाला लावले आहे. शक्य झाल्यास एमपीडीएचाही प्रस्ताव अवैध दारू गुत्ते चालविणाऱ्या विरोधात प्रस्तावित केला जाणार आहे.

टॅग्स :Governmentसरकारliquor banदारूबंदी