शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महिला पोलिसांशी अश्लील संभाषण करणाऱ्या मोबाईल रोमिओला अटक

By सुरेंद्र राऊत | Updated: May 6, 2023 17:51 IST

Yawatmal News राज्याच्या पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क करून लगट करणाऱ्या मोबाईल रोमियोला यवतमाळ पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली.

सुरेंद्र राऊतयवतमाळ : राज्याच्या पोलिस दलातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क करून लगट करणाऱ्या मोबाईल रोमियोला यवतमाळ पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातून अटक केली. त्याने दिलेल्या कबुलीतून धक्कादायक कारनामा पुढे आला आहे. हा युवक महिला पोलिसांनाच टार्गेट करीत होता. काहींनी त्याच्याविरुद्ध तक्रारी केली तर काहींनी दुर्लक्ष केले. यवतमाळातील महिला पोलिस अधिकाऱ्याशी अश्लील संभाषण केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल होता. यातच त्याला ताब्यात घेण्यात आले.

मारोती सुरेश लगसे (३०) रा. लहु ता. माढा जि. सोलापूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मारोतीच्या घरी शेती असून त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सर्वसाधारण आहे. तो आई-वडिलांना पोलिस उपनिरीक्षक होण्याची तयारी करीत असल्याचे सांगून त्यांच्याकडून पैसे घेत होता. या पैशाचा वापर तो महिला व मुलींची छेडखानीसाठी करीत होता. पोलिस ट्रेनिंग सेंटर नाशिक येथे प्रशिक्षणार्थी पोलिस उपनिरीक्षक म्हणून असल्याची बतावणी मारोती करीत होता. महिला पोलिस हे मारोतीचे सर्वात मोठे टार्गेट होते. यासोबतच त्याने काही महाविद्यालयीन विद्यार्थिनींनाही आपल्या जाळ्यात ओढले होते.

मनमाड येथे एका मुलीकडे तो राहायला गेला. पोरगा चांगला आहे, त्याला जावई म्हणून स्वीकारण्यास काही हरकत नाही, असा समज त्या मुलीच्या कुटुंबीयांचा झाला. त्यामुळे सलग चार महिने हा मुलीकडे मुक्कामी होता. मुलीच्या भावाने मारोतीची गावात जावून चौकशी केल्यानंतर त्याचे बिंग फुटले. तो रिकाम टेकडा असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याला घरातून हाकलून देण्यात आले. तरीही मारोतीच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. 

असा करायचा पोलिस महिलांशी संपर्कमहिला पोलिस अधिकारी, कर्मचारी यांचे सोशल मीडियावर स्टेटस् पाहून त्यांचे नाव व नियुक्तीचे ठिकाण लिहून घेत होता. नंतर त्या जिल्ह्यातील नियंत्रण कक्षात फोन करून संपर्क क्रमांक मिळवित होता. मोबाईलवर संपर्क करून महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांशी अश्लील संभाषण करायचा. कुणाला प्रेमाची मागणी घालायचा. यवतमाळच्या महिला अधिकाऱ्यासोबतही त्याने असाच प्रकार केला. महिला अधिकाऱ्याने दुर्लक्ष न करता तक्रार दाखल केली.

सायबरने शोधले लोकेशन

शहर पोलिसांना सायबर टीमने मोबाईल रोमियोचे लोकेशन ट्रस करुन दिले. त्यानंतर सहायक निरीक्षक जनार्धन खंडेराव, रवी नेवारे, सुनील फलटने, राजू कांबळे, अंकुश फेंडर यांनी आरोपीला त्याच्या गावातून ताब्यात घेतले. मारोती लगसे याने १५ ते १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांशी असभ्य वर्तन केल्याचा प्रकार पुढे आला आहे. आणखीही त्याच्याविरोधात तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. यवतमाळ पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर करून ८ मेपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंग