मनसेच्या प्रचारात महिलांची मुसंडी

By Admin | Updated: September 21, 2014 00:04 IST2014-09-21T00:04:31+5:302014-09-21T00:04:31+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा उमेदवाराच्या समर्थनार्थ आता महिलांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. मनसेच्या लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकाऱ्यांनी शहरात शनिवारपासून घरोघरी पोहोचून

MNS campaign rally | मनसेच्या प्रचारात महिलांची मुसंडी

मनसेच्या प्रचारात महिलांची मुसंडी

वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विधानसभा उमेदवाराच्या समर्थनार्थ आता महिलांनी चांगलीच मुसंडी मारली आहे. मनसेच्या लोकप्रतिनिधी, महिला पदाधिकाऱ्यांनी शहरात शनिवारपासून घरोघरी पोहोचून मतदारांशी संपर्क सुरू केला आहे.
विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच सर्वच पक्ष उमेदवाराच्या शोधात आहेत. महायुती आणि आघाडीचे अद्याप जागा वाटप झाले नाही. मात्र मनसेने निवडणूक घोषित होताच थेट प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. नुकतीच बाजोरिया लॉनमध्ये मनसेने निवडक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीपासून मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच ‘चार्ज’ झाले आहे. गावागावांत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. त्यातच शनिवारपासून मनसेच्या महिला लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे.
मनसेच्या नगराध्यक्ष प्रिया लभाने, नगरसेविका गीता सूर, इंदिरा पारखी आदींसह राजू उंबरकर यांच्या पत्नीने पक्षाच्या प्रचारार्थ आजपासून शहरात सुरूवात केली. त्यांच्यासोबत मनसेचे शहराध्यक्ष कोनप्रतिवार आणि इतर पदाधिकारी वणी शहरातील घरोघरी पोहोचत आहेत. पक्षाचे ध्येयधोरण, समस्या, विकासाचा मापदंड, जनतेच्या अपेक्षा, मूलभूत समस्यांवर उपाय आदींबाबत ही महिला मंडळी मतदारांना बोलके करीत आहेत. त्यांच्या समस्या जाणून घेत आहे. महिलांचा हा जत्था आज वणीत अनेक घरी पोहोचला. त्यामुळे विधानसभा निवडणूक मनसेने चांगलीच मनावर घेतल्याचे स्पष्ट होत आहे.
मनसेच्या लोकप्रतिनिधी आणि पक्ष पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीचा जागर सुरू केल्याने मतदारही त्यांच्याकडे उत्सुकतेने बघत आहे. महिला प्रचारार्थ फिरत असल्याने एक वेगळेच वलय निर्माण झाले आहे. मनसेचे नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील लोकप्रतिनिधी प्रचारात सहभागी झाले आहे. खुद्द उंबरकर आता ग्रामीण भागात नव्याने भेटीगाठी घेऊन जनतेच्या समस्या ऐकून घेत आहे. त्या सोडविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची ग्वाही देत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: MNS campaign rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.