शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

सराफाची नजर चुकवून सोन्याची बांगडी पळविली; व्हिडिओ झाला व्हायरल

By सुरेंद्र राऊत | Updated: March 21, 2023 19:37 IST

सौरभ दिनेश बोरा यांचे मेनलाइनमध्ये बोरा ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सुमारे ३० ते ३५ या वयोगटातील दोन अनोळखी महिला दुकानामध्ये आल्या

सुरेंद्र राऊत/ यवतमाळ

यवतमाळ : तोंडाला स्कार्प गुंडाळून आलेल्या दोन अनोळखी महिलांनी सराफाची नजर चुकवून सुमारे एक लाख २० हजार रुपये किमतीची सोन्याची बांगडी लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी मेनलाइनमधील बोरा ज्वेलर्स येथे घडली. याप्रकरणी दोन महिलांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

सौरभ दिनेश बोरा यांचे मेनलाइनमध्ये बोरा ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास सुमारे ३० ते ३५ या वयोगटातील दोन अनोळखी महिला दुकानामध्ये आल्या. यातील एकीने चेहऱ्याभोवती हिरवा व पांढरा रंगाचा स्कार्प गुंडाळला होता, तर दुसऱ्या महिलेने हिरव्या रंगाची साडी परिधान केलेली होती. त्यांनी सोन्याच्या बांगड्या दाखविण्यास सांगितले. ट्रेमधून या बांगड्या दाखविल्या जात असताना सराफाची नजर चुकवून ट्रेमधील एक सोन्याची बांगडी या महिलांनी पळविली. याप्रकरणी रात्री ११ च्या सुमारास यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :GoldसोनंCrime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळ