प्रमाणित मतदार यादीतील पाने गहाळ

By Admin | Updated: November 7, 2016 01:04 IST2016-11-07T01:04:45+5:302016-11-07T01:04:45+5:30

शासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे नगरपरिषदेच्या प्रमाणित मतदार यादीतील पानेच्या पाने गहाळ झाल्याचे पुढे आले आहे.

Missing pages in certified voters list | प्रमाणित मतदार यादीतील पाने गहाळ

प्रमाणित मतदार यादीतील पाने गहाळ

यवतमाळ नगरपरिषद : प्रभाग १८ मधील प्रकार
यवतमाळ : शासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे नगरपरिषदेच्या प्रमाणित मतदार यादीतील पानेच्या पाने गहाळ झाल्याचे पुढे आले आहे. मतदार यादीत नावांचा घोळ तर आहेच. परंतु आता त्यातील पानेच गहाळ होत असल्याने मतदार यादीवर प्रश्नचिन्ह लागले आहे.
यवतमाळ नगरपरिषदेच्या मतदार यादीत मोठ्याप्रमाणात अनियमितता आहे. नगरपरिषदेने प्रसिध्द केलेल्या अंतिम मतदार यादीतून अनेकांची नावे गहाळ झाली आहे. आता तर यवतमाळातील प्रभाग क्रमांक १८ च्या भाग २४१ मधून मदतारांच्या नावाची अनेक पाने गहाळ आहेत. निवडणूक प्रचारसाठी येथील उमेदवारांनी नगरपरिषद प्रशासनानकडे रितसर पैसे भरून प्रमाणित यादी घेतली. या यादीतूनच प्रभागातील अनेक मदतारांची नावे गहाळ असल्याचे आढळून आले आहे. नगरपरिषद प्रशासनाने मतदार यादी तयार करण्याचे खासगी व्यक्तीला कंत्राट दिले. या याद्या तयार झाल्यानंतर त्याची पडताळणी येथील प्राधिकृत अधिकाऱ्याने केली नाही. त्यामुळे ऐन प्रचाराच्या रणधुमाळीत मोठी समस्या निर्माण झाली आहे. येथील प्राधीकृत अधिकाऱ्याने दिलेल्या यादतील भाग क्रमांक २४१ मध्ये ६०२१ नंतर थेट ६३३६ असेच मतदार दाखविण्यात आले आहे. ९ हजार ४४६ मतदार संख्या असलेल्या या प्रभागातील प्रमाणित मतदार यादीतून नावे गहाळ असल्याने तेथील नागरिकांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मतदार यादीच्या प्रमाणित हार्डकॉपीजमध्ये घोळ असल्याने प्रभाग १८ च्या उमेदवारांनी स्फॉट कॉपी पालिकेत मागितली. पालिकेडून देण्यात आलेल्या पेनड्राईव्हमध्ये यापेक्षा ही भयंकर प्रकार असल्याचे उघड झाले. मतदार यादीतील तब्बल २२ पानेच गायब आहेत.
यावरून नगपरिषदेतील प्राधिकृत अधिकारी निवडणूक काळातही गांभीर्याने काम करत नसल्याचे दिसून येते. आता याची निवडणूक निर्णय अधिकारी आणि आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे प्रभाग १८ मधील उमेदवारांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Missing pages in certified voters list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.