पीडित मुलीचा मारहाणीत गर्भपात

By Admin | Updated: May 15, 2016 02:05 IST2016-05-15T02:05:58+5:302016-05-15T02:05:58+5:30

घाटंजी येथील एका निराधार मुलीला गावातील एका व्यावसायिक तरुणाने प्रेमपाशात ओढून शोषण केले.

Miscarriage of a victim girl | पीडित मुलीचा मारहाणीत गर्भपात

पीडित मुलीचा मारहाणीत गर्भपात

घाटंजीची घटना : नातेवाईक आरोपींना अभय
यवतमाळ : घाटंजी येथील एका निराधार मुलीला गावातील एका व्यावसायिक तरुणाने प्रेमपाशात ओढून शोषण केले. लग्नाचे आमिष दाखवून तिच्या एकटेपणाचा फायदा घेण्यात आला. अशातच ती दीड महिन्याची गर्भवती झाली. त्यानंतर प्रियकराने लग्नास नकार दिला. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रिकराला बलात्काराच्या गुन्ह्यात अटक केली. मात्र प्रियकराच्या नातेवाईकांनी पीडित मुलीला मारहाण केली. यातच तिचा गर्भपात झाला.
सतीश अंबादास भूत याने वडील नसलेल्या एका निराधार युवतीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. लग्नाचे आमिष दाखवून शोषण केल्याने या मुलीला दिवस गेले. असाह्य तरुणीने घाटंजी पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी सतीशला ताब्यात घेतले. यानंतर सतीशच्या नातेवाईकांनी १ मेच्या रात्री १२ वाजता पीडित मुलीला मारहाण केली. घटनेनंतर या प्रकरणी घाटंजी पोलिसात तक्रार देऊनही दोषींवर कारवाई करण्यात आली नाही. मारहाणीतच पीडित मुलीचा गर्भपात होऊन प्रकृती खालावल्याने तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर तिने गावात परत जाण्यास नकार दिला. आरोपीच्या कुटुंबीयांपासून आपल्याला धोका आहे. परंतु आरोपींना पोलिसांकडून अभय मिळत असल्याचा आरोप तिने करून मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. या मुलीची महिला व बालविकास कार्यालयाने अकोला येथील जागृती महिला वसतिगृहात रवानगी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Miscarriage of a victim girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.