ग्रामसभेला मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांची हजेरी
By Admin | Updated: May 1, 2015 01:55 IST2015-05-01T01:55:33+5:302015-05-01T01:55:33+5:30
मुंबईच्या मंत्रालयात बसून कारभार हाकणाऱ्या कक्ष अधिकाऱ्यांना आता ग्रामसभेला हजेरी लावावी लागणार असून ...

ग्रामसभेला मंत्रालयीन कक्ष अधिकाऱ्यांची हजेरी
यवतमाळ : मुंबईच्या मंत्रालयात बसून कारभार हाकणाऱ्या कक्ष अधिकाऱ्यांना आता ग्रामसभेला हजेरी लावावी लागणार असून यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र दिनी आयोजित ग्रामसभेला ३७ कक्ष अधिकारी विविध ठिाकणी उपस्थित राहणार आहे. ग्रामीण भागाचा कारभार ग्रामसभेच्या माध्यमातून कसा चालतो याचा ते अभ्यास करणार आहे.
गावपातळीवरच्या योजनांचे प्रारुप मंत्रालयात तयार केले जाते. ज्या कक्ष अधिकाऱ्यांकडून योजना आखण्यात येतात. त्यांना प्रत्यक्ष ग्रामीण भाग आणि ग्रामपंचायतीचे प्रशासन कसे आहे याची कोणतीच जाणीव नसते. परिणामी ग्रामविकासाच्या अनेक योजना फसतात. या योजना लोकाभिमूख बनविण्यासाठी कक्ष अधिकाऱ्यांना ग्रामीण भागाचा अभ्यास करणे सक्तीचे केले आहे. याच अंतर्गत यापूर्वीसुद्धा ३२ कक्ष अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतींना भेटी दिल्या होत्या. आता महाराष्ट्र दिनी ३७ कक्ष अधिकारी ग्रामसभेच्या कामकाजात सहभागी होऊन प्रत्यक्षात येणाऱ्या अडीअडचणींचा अभ्यास करणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)