‘एमआयएम’चे प्रशासनाला निवेदन

By Admin | Updated: May 8, 2016 02:01 IST2016-05-08T02:01:00+5:302016-05-08T02:01:00+5:30

वणी शहरासह परिसरातील विविध समस्या ‘एआयएमआयएम’ ने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मांडल्या.

'MIM' administration request | ‘एमआयएम’चे प्रशासनाला निवेदन

‘एमआयएम’चे प्रशासनाला निवेदन

वणीतील समस्या : प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा
यवतमाळ : वणी शहरासह परिसरातील विविध समस्या ‘एआयएमआयएम’ ने जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे मांडल्या. यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे.
वणी परिसरात कोळशाची तस्करी, जुगार अड्डे, क्रिकेट सट्टा, अवैध दारुविक्री प्रचंड प्रमाणात सुरू आहे. या प्रकारात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. अनेक युवक आत्महत्येसारखा मार्ग स्वीकारत आहे. गुन्हेगारी वाढल्याने शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे. वणी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात असे प्रकार वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देताना एआयएमआयएमचे अध्यक्ष शाज अहमद, महासचिव अ‍ॅड़ शोएब शेख, सचिव अ‍ॅड़ सोहेल मालानी, खिजर अमीद, कोषाध्यक्ष डॉ. निजामुद्दीन अन्सारी, तौफिक खान, जावेद कुरेशी, जाफर मिर्झा बेग, वसिम शेख, सैयद एजाज आदी उपस्थित होते.
एएमआयएमच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. सामाजिक हिताच्या दृष्टीने प्रशासनाकडे पाठपुरावा करून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. वणीतील समस्या तत्काळ मार्गी लागव्या यासाठी निवेदन देण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: 'MIM' administration request

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.