कैलाशपुरीच्या शेतकऱ्याला पीठ गिरणी
By Admin | Updated: October 5, 2015 02:37 IST2015-10-05T02:37:15+5:302015-10-05T02:37:15+5:30
कळंब तालुक्यातील कैलाशपुरी (जामोणा) येथील शेतकरी हुसेन लखमाजी मेश्राम या शेतकऱ्यास पीठ गिरणीचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

कैलाशपुरीच्या शेतकऱ्याला पीठ गिरणी
यवतमाळ : कळंब तालुक्यातील कैलाशपुरी (जामोणा) येथील शेतकरी हुसेन लखमाजी मेश्राम या शेतकऱ्यास पीठ गिरणीचे वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. आपुलकी संस्थेच्यावतीने सदर पीठ गिरणी देण्यात आली. हा कार्यक्रम विश्रामभवन येथे पार पडला.
हुसेन मेश्राम यांनी काही दिवसापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तातडीच्या उपचारामुळे सदर शेतकरी बरा झाला. पुणे येथील आपुलकी संस्थेच्यावतीने त्यांना उदरनिर्वाहासाठी चक्की देण्याचे ठरले होते. संस्थेचे अभिजित फाळके यांच्या प्रयत्नाने निशिकांत गणेश पांडे आणि वेदांत बुआ यांच्या सहकार्याने सदर पीठ गिरणी पालकमंत्री संजय राठोड व खासदार भावना गवळी यांच्याहस्ते देण्यात आली. यावेळी ज्येष्ठ कृषिभूषण शेतकरी आनंद सुभेदार यांच्यासह आपुलकी संस्थेचे प्रसाद नायगावकर, अश्विन सवालाखे उपस्थित होते. (शहर वार्ताहर)