दूध उत्पादनात सव्वा लाख लिटरने वाढ
By Admin | Updated: October 31, 2015 00:28 IST2015-10-31T00:28:34+5:302015-10-31T00:28:34+5:30
जिल्ह्याच्या दूध उत्पादनात सव्वा लाख लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. यासोबतच एका खासगी कंपनीने दूध संकलनासाठी पुसद केंद्र भाडेतत्वावर मागितले आहे.

दूध उत्पादनात सव्वा लाख लिटरने वाढ
खासगी कंपनीचा पुढाकार : पुसदचे केंद्र घेणार भाडेतत्वावर, उमरखेडसाठी हालचाली
यवतमाळ : जिल्ह्याच्या दूध उत्पादनात सव्वा लाख लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. यासोबतच एका खासगी कंपनीने दूध संकलनासाठी पुसद केंद्र भाडेतत्वावर मागितले आहे. उमरखेडच्या संकलन केंद्रावर दूध संकलनाचे काम कंपनीने हाती घेतले आहे.
जिल्ह्यातील उपलब्ध दुधाळ जनावरे अधिक उत्पादनक्षम बनविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला. यामुळे दोन लाख ५८ हजार लिटरचे दूध तीन लाख ७७ हजार लिटरवर पोहोचले आहे. यामध्ये सव्वा लाख लिटरची वाढ नोंदविण्यात आली आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेत जिल्ह्याला सहा लाख सात हजार ५०० लिटरची आवश्यकता आहे. जिल्ह्याला दोन लाख ३० हजार ५०० लिटरचा तुटवडा भासत आहे. निर्माण झालेला तुटवडा भरून काढण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातून येणाऱ्या दुधावर जिल्ह्याला विसंबून राहावे लागत आहे.
जिल्ह्यात सव्वालाख लिटर दुधाचे उत्पादन वाढले आहे. असे असले तरी अधिक उत्पादन वाढविण्यासाठी मोठा स्कोप आहे. गुजरातमधील दूध उत्पादक कंपन्या जिल्ह्यात शिरल्या आहेत. त्यांनी उमरखेड, महागाव, पुुसद आणि आर्णी तालुक्यात दूध संकलनाचे काम त्यांनी सुुरू केले आहे. शासकीय दराच्या तुलनेत खासगी दूध संकलन करणाऱ्या कंपन्यांनी दूधाला अधिक दर दिले आहेत. यामुळे दूध विक्रेत्यांचा सर्वाधिक कल खासगी डेअरीकडे आहे. (शहर वार्ताहर)