शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

संशयास्पद स्थितीत आढळला मायलेकाचा मृतदेह, घातपाताची शंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2020 20:35 IST

आत्महत्येचा संशय : कळमना शिवारातील घटना

ठळक मुद्देकळमना शेतशिवारात रविवारी दुपारी गुराखी जनावरे चरत असताना त्याला नागोराव कातकडे यांच्या शेतात या दोघांचे मृतदेह आढळून आले. तसेच त्यांच्याजवळ मोनोसील नावाचा विषारी औषधाचा डबाही आढळून आला.

वणी (यवतमाळ) : चिखलगावलगच्या कळमना शिवारातील नाल्याजवळ रविवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास मायलेकाचा मृतदेह आढळून आला. ही आत्महत्या की घातपात, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. संगीता दुर्वास निखाडे (४५) व राहुल दुर्वास निखाडे (२२) असे मृत मायलेकाचे नाव असून हे दोघेही चिखलगाव येथील रहिवासी आहेत.

कळमना शेतशिवारात रविवारी दुपारी गुराखी जनावरे चरत असताना त्याला नागोराव कातकडे यांच्या शेतात या दोघांचे मृतदेह आढळून आले. तसेच त्यांच्याजवळ मोनोसील नावाचा विषारी औषधाचा डबाही आढळून आला. त्यामुळे या दोघांनी आत्महत्या केली की घातपात करण्यात आला, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. याबाबत प्रभारी पोलीस पाटलाने वणी पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्या दोघांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान दुर्वास निखाडे हे बाहेरगावी असल्याने त्यांना या घटनेबाबत माहिती देण्यात आली. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी वणीच्या ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतरच आता मृत्यूचे कारण कळू शकेल. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रभाकर कांबळे, प्रशांत आडे हे करित आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळDeathमृत्यू