कायर वीज वितरणवर मध्यरात्री धडकला मोर्चा
By Admin | Updated: June 26, 2017 00:55 IST2017-06-26T00:55:22+5:302017-06-26T00:55:22+5:30
गेल्या अनेक दिवसांपासून कायरसह परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून त्रस्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी रात्री येथील विद्युत उपकेंद्रावर धडक दिली.

कायर वीज वितरणवर मध्यरात्री धडकला मोर्चा
कर्मचाऱ्यांना घेराव : वीज सुरळीत ठेवण्याची ग्वाही
लोकमत न्यूज नेटवर्क
कायर : गेल्या अनेक दिवसांपासून कायरसह परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून त्रस्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी रात्री येथील विद्युत उपकेंद्रावर धडक दिली.
कायर परिसरातील बाबापूर, चेंडकापूर, सैदाबाद, पठारपूर, सिंदीवाढोणा, पुरड या गावात गेल्या अनेक दिवसांपासू विद्युत पुरवठा खंडित राहत होता. त्यामुळे विविध समस्या निर्माण झाल्या होता. त्याचबरोबर शेतात ओलित करणेही कठीण झाले होते. त्यामुळे परिसरातील नागरिक व कायर येथील नागरिकांनी शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास येथील विद्युत उपकेंद्रावर धडक दिली.
रात्री महावितरणवर मोर्चा धडकल्याने अख्खे गाव जागे झाले. याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, सध्या कायर येथील वीज पुरवठा घोन्सा येथून जोडण्यात आल्याचे सांगितले. सात दिवसाच्या आत काम संपताच वीज पुरवठा सुरळीत राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी परिसरातील नागकि मोठ्या संख्येने उपस्थित होते.