पुसदमध्ये गणरायाला निरोप

By Admin | Updated: September 9, 2014 00:41 IST2014-09-09T00:41:07+5:302014-09-09T00:41:07+5:30

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात विघ्नहर्त्या गणरायाला भक्तांनी निरोप दिला. पुसद शहरातून ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळीत विसर्जन मिरणुकी सोमवारी दिवसभर निघत होत्या.

Message to Ganaraya in Pusad | पुसदमध्ये गणरायाला निरोप

पुसदमध्ये गणरायाला निरोप

पुसद : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात विघ्नहर्त्या गणरायाला भक्तांनी निरोप दिला. पुसद शहरातून ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळीत विसर्जन मिरणुकी सोमवारी दिवसभर निघत होत्या. पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवला होता.
पुसद नगरीचा मानाचा गणपती असलेल्या गणबादेव गणेश मंडळाच्या गणपतीची पूजा करून सकाळी ११ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. गणेश चतुर्थीला गणरायाचे आगमन झाले त्यावेळी वरून राजाने हजेरी लावली होती. त्यानंतर १० दिवस पाऊस बरसत होता. गणेश उत्सवात शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. गणेश विजर्सनालाही पावसाने हजेरी लावली.
गणरायाची मिररणूक आझाद चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, सुभाष चौक, कापड लाईन, नगीना चौक, देवकृपा चौक, सराफा बाजारातून नृसिंह मंदिराकडून पुस नदीकडे जात होती. मानाच्या पाटलांच्या गणपतीचे सर्वप्रथम विसर्जन झाले.
मिरवणुकीदरम्यान रिमझीम पाऊस सुरू होता. त्यामुळे गणेश भक्तांत उत्साह संचारला होता. गुलालाची उधळण करित ताशांच्या गजरात भक्त बेधुंद होऊन नाचत होते. समाजसेवी संस्थांच्यावतीने गणेश भक्तांसाठी फलाहार, पेयजलाची व्यवस्था करण्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर ठाणेदार सोनुने मिरणुकीवर बारीक लक्ष ठेऊन होते. विसर्जन मिरवणूक बंदोबस्तासाठी शहरातील पोलिसांसह १२५ होमगार्ड, राज्य राखीव दलाचे जवान, ४० प्रशिक्षणार्थी कमांडो, ५० कमांडो आदी तनात करण्यात आले होते. पुस नदी खळखळून वाहत असल्याने गणेश मूर्तीच्या विसर्जनासाठी मंडळांना परिश्रम घ्यावे लागले नाही. नगर परिषद व निसर्ग संवादच्यावतीने निर्माल्य संकलन पेट्या लावण्यात आल्या होत्या. शहरात मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही. सर्व शिस्तबद्ध होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Message to Ganaraya in Pusad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.