ईदनिमित्त पोलीस मुख्यालयात बैठक

By Admin | Updated: September 25, 2015 03:17 IST2015-09-25T03:17:12+5:302015-09-25T03:17:12+5:30

बकरी ईद व गणपती उत्सवानिमित्त पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेत बुधवारी बैठक घेण्यात आली.

Meeting at the police headquarters on the occasion of Eid | ईदनिमित्त पोलीस मुख्यालयात बैठक

ईदनिमित्त पोलीस मुख्यालयात बैठक

यवतमाळ : बकरी ईद व गणपती उत्सवानिमित्त पोलीस मुख्यालयात पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या अध्यक्षतेत बुधवारी बैठक घेण्यात आली.
सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, सहाय्यक आयुक्त, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच सर्व कुरेशी, खाटीक, विविध गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग म्हणाले, महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा कायदा १९९५ हा सुधारणेसह ४ मार्च २०१५ पासून लागू झाला आहे. या कायद्यामध्ये राज्यात गोवंश हत्याबंदी करण्यात आली असल्याने गाई, वळू व बैल यांची कत्तल करण्यास मनाई आहे. तसेच राज्यात गाई, वळू व बैलाच्या कत्तलीसाठी वाहतूक निर्यात, खरेदी तसेच गोवंशाचे मांस बाळगण्यास बंदी आहे. प्राणी संरक्षण कायद्याची अंमलबजावणी ही पूर्णपणे जिल्हा प्रशासनाने करावयाची आहे. याची खबरदारी म्हणून जिल्हा, तालुका, पोलीस, परिवहन व पशुसंवर्धन अधिकारी यांचा समावेश असलेली पथके स्थापन करण्यात आली आहेत. यवतमाळ जिल्ह्याच्या व आंध्रप्रदेश सीमेवर २४ तास नाकाबंदी सुरू करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Meeting at the police headquarters on the occasion of Eid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.