भारतीय बौद्ध महासभेची नेर येथे सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 21:46 IST2017-08-24T21:46:35+5:302017-08-24T21:46:58+5:30
दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेची विशेष सभा येथील गौतम आश्रमशाळेत घेण्यात आली. बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने अध्यक्षस्थानी होते.

भारतीय बौद्ध महासभेची नेर येथे सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया भारतीय बौद्ध महासभेची विशेष सभा येथील गौतम आश्रमशाळेत घेण्यात आली. बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष धर्मपाल माने अध्यक्षस्थानी होते.
यावेळी सुखदेवराव जाधव, सदाशिवराव भालेराव, जयकृष्ण बोरकर, बापूराव रंगारी, आनंद भगत, राजेश्वर शिरसाट, डॉ. आनंदराव कांबळे, के.के. पाईकराव, भीमराव काळपांडे, सखाराम देवपारे, रमेश रंगारी, महादेव अढावे, आनंदराव इंगोले, गुलाबराव रामटेके, डी.जे. भगत आदींनी मार्गदर्शन केले.
सभेमध्ये जिल्हा विभाग प्रमुख नियुक्तीला मान्यता देण्यात आली. विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेचे संचालन काशीनाथ ब्राह्मणे यांनी, तर आभार तालुकाध्यक्ष विनोद रंगारी यांनी मानले. सभेला उज्ज्वलाबाई गोंडाणे, वसंतराव रामटेके, भीमराव काळे, अर्चू बोरकर, अर्चना गौतम बोरकर, रंजना लांजेवार, देवकाबाई पोटे, मीराबाई पारवेकर, खुशालराव काळपांडे, अनिता गोंडाणे, प्रसीस बोरकर, पीयूष गोंडाणे, अन्वय बोरकर, ऋतुजा गोंडाणे, समीक्षा बोरकर, स्वरा बोरकर आदींची उपस्थिती होती.
सभेपूर्वी जयकृष्ण बोरकर यांनी मुलींसाठी बांधलेल्या वसतिगृहाच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. भदन्त धम्मानंद महास्थवीर, भदन्त प्रा. सुमेधबोधी महास्थवीर यांच्या हस्ते बुद्ध वंदना परित्राण पाठ, विश्वशांतीसाठी धम्मदेशना देण्यात आली. बंडू बोरकर, संघानंद बोरकर आणि बोरकर परिवारातर्फे भोजनदान देण्यात आले.