शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 22:06 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासोबत सभा घेण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सभेमध्ये प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्दे‘डीएचओं’शी चर्चा : राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा परिषदेच्याआरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचे रखडलेले प्रश्न निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दुर्योधन चव्हाण यांच्यासोबत सभा घेण्यात आली. राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या सभेमध्ये प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.पदोन्नती, कालबद्ध पदोन्नती प्रकरणे, रिक्त पदे भरणे, सेवापुस्तकांचे अद्यावतीकरण, बदली झालेल्या आणि बदलून आलेल्या कर्मचाºयांचे वेतन, रखडलेले वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह प्रकरणे, आदिवासी नक्षलग्रस्त भागातील कर्मचाऱ्यांना एकस्तर व थकबाकी, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात डाटा एंट्री आॅपरेटरची नियुक्ती, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वाहन दुरुस्तीसाठी निधी, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांसाठी प्रतीक्षालय आदी विषयांवर शिष्टमंडळाने बाजू मांडली. चर्चेनंतर सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दुर्योधन चव्हाण यांनी शिष्टमंडळाला दिले.यावेळी राष्ट्रीय मुलनिवास बहुजन कर्मचारी ट्रेड युनियनतर्फे अध्यक्ष नरेंद्र वासनिक, उपाध्यक्ष राजेश वाडी, कार्याध्यक्ष अनिल जयसिंगपुरे, सरचिटणीस शंकर महल्ले, कोषाध्यक्ष हेमलता वैद्य, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयातर्फे अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. किशोर कोषटवार, प्रभारी प्रशासकीय अधिकारी, व्ही.एस. रेवडी, सहाय्यक प्रशासन अधिकारी व्ही.जी. गुल्हाने, कनिष्ठ प्रशासन अधिकारी एन.यू. राऊत, लेखा व अर्थविभागाचे गजानन डाफे, मनोज खोडे, गणेश चिंडाले आदी उपस्थित होते.

टॅग्स :Healthआरोग्यzpजिल्हा परिषद