बारा बलुतेदार महासंघाची सभा

By Admin | Updated: September 29, 2016 01:15 IST2016-09-29T01:15:42+5:302016-09-29T01:15:42+5:30

बारा बलुतेदार महासंघाची सभा येथे घेण्यात आली. यावेळी अमरावती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र मुके,

Meeting of Barlatdar Mahasangh | बारा बलुतेदार महासंघाची सभा

बारा बलुतेदार महासंघाची सभा

यवतमाळ : बारा बलुतेदार महासंघाची सभा येथे घेण्यात आली. यावेळी अमरावती विभागाचे अध्यक्ष राजेंद्र मुके, विभागीय सचिव संतोष मोतेवार, उपाध्यक्ष प्रकाश क्षीरसागर, संघटक संजय चुनारकर, यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम, शहर अध्यक्ष राजेश रेकलवार प्रामुख्याने उपस्थित होते.
न्हावी, धोबी, शिंपी, लोहार, कुंभार, बेलदार, कलार, परिट, सोनार, सुतार, गोसावी, गुरव, साडी रंगारी, पिंजारी या बारा बलुतेदार समाजाची परिस्थिती स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही दयनीय आहे. त्यांचा आर्थिक, शैक्षणिक तसेच सामाजिक विकास झालेला नाही. ओबीसीच्या १९ टक्के आरक्षणाचा पाव भागही बारा बलुतेदारांच्या वाट्याला येत नाही. ओबीसींसाठी असलेल्या आर्थिक विकास महामंडळाचाही फायदा होत नाही. या बाबीला शासन व्यवस्था जबाबदार असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडले. बारा बलुतेदार महासंघाच्या छताखाली सर्व जातींनी एक व्हावे, असे आवाहन विदर्भ विभागाचे अध्यक्ष राजेंद्र मुके यांनी यावेळी केले.
या सभेत यवतमाळ शहर कार्यकारिणी गठित करण्यात आली. शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी राजेंद्र गिरी यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कार्यकारिणीत उपाध्यक्ष नरेश काळे, हरिश मांडवकर, सहसचिव दिलीप करमिलकर, सुनील घडीनकर, शहर संघटक ज्ञानेश्वर बागडे, गुरुदेव कोसरे यांचा समावेश आहे. कार्यकारिणी सदस्य म्हणून अनिल अतकर, ज्ञानेश्वर मेसेकर, रूपेश खरवडे, चंद्रशेखर केवतकर, अनिल घेनावत, प्रवीण वनस्कर, किशोर दुलरवार, मनिष महागमकार, योगेश रेकलवार, ज्ञानेश्वर बागडे, अमोल खोबरकर, आप्पाराव हळदकर, संजय चलकेलवार, शंकर पोटपल्लीवार, प्रभाकर पिल्लेवार, विजय गोविंदवार, पुरुषोत्तम मादेश्वर, मनोहर रेकलवार, गजानन लिंगनवार यांची नियुक्ती झाली आहे.
सभेचे प्रास्ताविक शहर अध्यक्ष राजू रेकलवार, संचालन जिल्हाध्यक्ष प्रमोद मेश्राम यांनी, तर आभार चंद्रशेखर केळतकर यांनी मानले. (वार्ताहर)

Web Title: Meeting of Barlatdar Mahasangh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.