शिक्षकांच्या समस्यांसाठी मंत्र्यांना साकडे

By Admin | Updated: March 7, 2016 02:22 IST2016-03-07T02:21:43+5:302016-03-07T02:22:52+5:30

जिल्हा शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथे पार पडली. यावेळी उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील...

Meet the ministers for teachers' problems | शिक्षकांच्या समस्यांसाठी मंत्र्यांना साकडे

शिक्षकांच्या समस्यांसाठी मंत्र्यांना साकडे


यवतमाळ : जिल्हा शिक्षक आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक येथे पार पडली. यावेळी उपस्थित असलेले गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील आणि शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांना
विविध समस्यांबाबत निवेदन देण्यात आले.
गृहराज्यमंत्री आणि शिक्षक आमदार यवतमाळ दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हा शिक्षक आघाडीच्या बैठकीला भेट दिली. यावेळी जिल्हा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष अविनाश रोकडे व समुपदेशक संघटनेचे अध्यक्ष किशोर बनारसे यांची उपस्थिती होती. बैठकीला संपूर्ण जिल्ह्यातून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची निवेदने प्राप्त झाली होती. समुपदेशक संघटना आदिवासी आश्रमशाळा, व्हीजेएनटी आश्रमशाळा आदींच्या समस्या निवेदनाव्दारे मांडण्यात आल्या. या समस्या समजूर घेऊन त्यावर विचार विमर्श करण्यात आला. बैठकीला यवतमाळ जिल्हा शिक्षक आघाडीचे पदाधिकारी श्याम पंचभाई, बंडू डाबरे, सिंगन, योगेश देशमुख, संदेश ढोले, निरंजन भगत, गजानन सोनवणे, धनंजय राऊत, मदने आदींची प्रमुख उपस्थिती होती. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Meet the ministers for teachers' problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.