सात महिन्यांत १९ जणांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ
By Admin | Updated: February 8, 2015 23:41 IST2015-02-08T23:41:41+5:302015-02-08T23:41:41+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो. त्याच्या मंजूरीचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना आहेत. यवतमाळात मात्र गेल्या काही महिन्यापासून वैद्यकीय

सात महिन्यांत १९ जणांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ
यवतमाळ : शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्यात येतो. त्याच्या मंजूरीचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना आहेत. यवतमाळात मात्र गेल्या काही महिन्यापासून वैद्यकीय प्रतिपूर्तीच्या देयकांना कात्री लावण्याचाच प्रकार सुरू आहे. सात महिन्याच्या कालावधीत एक हजार ५०४ कर्मचाऱ्यांनी देयके सादर केली. प्रत्याक्षात लाभ केवळ १९ कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. यावरून आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना निकषाच्या जाचात पकडण्यात आले आहेत.
जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात वैद्यकीय प्रतिपूर्तीचे देयके मंजूर करण्यासाठी तब्बल ४५ प्रकाराच्या अटी शर्थी ठेवण्यात आल्या आहेत. शासनाकडून देण्यात आलेल्या निर्देशाचे तंतोतंत पालन होत असले तरी अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना अथवा त्यांच्या कुटुंबियांना वैद्यकीय उपचाराचाच्या खर्चातील काही रक्कम वैद्यकीय प्रतिपुर्ती देयकाच्या माध्यतून दिली जाते. त्यासाठी विशिष्ट आजार आणि उपचाराचे ठिकाण नमूद केले आहेत. बरचेदा आणीबाणीच्या प्रसंगी उपचारासाठी या निकषांची पुर्तता करणे शक्य होत नाही. ठरवून उपचार घेणे शक्यच होत नाही. ह्यदय विकाराचा झटका आल्यानंतर नजीकच्याच रुग्णालयाचा आधार घ्यावा लागतो. परंतू ही बाब निकषात बसत नसल्याने अशा कर्मचाऱ्यांना सुध्दा वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ नाकारण्यात आला आहे. यापूर्वी इतके कठोर निकष कोणत्याच जिल्हा शल्यचिकित्साने लावले नव्हते. आत तर वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळणेच कठीण झाले आहेत. (कार्यालय प्रतिनिधी)