शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

आरोग्य प्रशासनावर ‘मॅट’ने बसविला २० हजारांचा कोर्ट खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:57 PM

नियमित वेतन व निवृत्ती वेतनासाठी आजारी वैद्यकीय अधिकाऱ्याला भटकंती करायला लावणाऱ्या राज्याच्या आरोग्य प्रशासनावर मुंबई ‘मॅट’ने ताशेरे ओढले असून सचिव, आयुक्त व संचालकांना संयुक्तपणे २० हजारांचा कोर्ट खर्चही बसविला आहे.

ठळक मुद्देताशेरेही ओढले आजारी वैद्यकीय अधिकाऱ्याला दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नियमित वेतन व निवृत्ती वेतनासाठी आजारी वैद्यकीय अधिकाऱ्याला भटकंती करायला लावणाऱ्या राज्याच्या आरोग्य प्रशासनावर मुंबई ‘मॅट’ने ताशेरे ओढले असून सचिव, आयुक्त व संचालकांना संयुक्तपणे २० हजारांचा कोर्ट खर्चही बसविला आहे.डॉ. सुहास विश्वनाथ जानू या वैद्यकीय अधिकाऱ्याने हे प्रकरण दाखल केले. मुंबई ‘मॅट’चे न्यायिक सदस्य ए.पी. कुºहेकर यांच्यापुढे सुनावणी होऊन ९ मे रोजी त्यावर निर्णय दिला गेला. डॉ. जानू हे २००७ मध्ये गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड येथे वैद्यकीय अधिकारी होते. तेथेच त्यांना मानसिक आजार झाला. नागपूरच्या सक्षम हॉस्पिटलमध्ये तपासणी करून १२ सप्टेंबर २००७ ला त्यावर शिक्कामोर्तब केले. तुम्ही सक्षम नाहीत, असे म्हणून त्यांना शासकीय नोकरीस अपात्र ठरविण्यात आले होते. त्यांना तात्पुरती पेंशन मंजूर केली गेली. दरम्यान ते २००९ मध्ये सेवानिवृत्त झाले. शासन २००७ पासून पेन्शन देण्यास तयार होते, मात्र डॉ. जानू यांनी आपल्याला २००९ पासून हे पेन्शन मिळावे म्हणून अ‍ॅड. गौरव बांदिवडेकर यांच्यामार्फत मुंबई ‘मॅट’मध्ये धाव घेतली. या प्रकरणात आरोग्य खात्याचे प्रधान सचिव, आयुक्त व संचालकांना प्रतिवादी बनविले गेले. तेथे पेन्शन रुल, अपंगत्व कायदा यावर बराच खल झाला.नव्या कायद्यांबाबत अपडेट नाहीसरकारला अपंगत्वाबाबत १९९५ ला तसेच २०१६ ला लागू कायद्यांबाबत पुरेसे ज्ञान नसल्याचेही ‘मॅट’च्या निदर्शनास आले. डॉ. जानू यांना ३१ जानेवारी २००९ पर्यंत नोकरीत आहेत, असे समजून नियमित पगार व तेथून पुढे नियमित पेन्शन लागू करा व सहा आठवड्यात सर्व लाभ द्या, असे आदेश ‘मॅट’ने या प्रकरणात दिले आहे. एवढेच नव्हे तर जाणीवपूर्वक विलंब, नव्या कायद्यांबाबत अपडेट नसणे, आजारी-अपंगाबाबत सहानुभूती न बाळगता काटेकोर वागणे आदी कारणांवरून आरोग्य प्रशासनातील तिघांवर संयुक्तपणे २० हजार रुपयांचा कोर्ट खर्च न्या. कुºहेकर यांनी बसविला आहे.सरकारी कर्मचारी २४ तास ड्युटीवरडॉ. जानू यांना ड्युटीवर असताना मानसिक आजार झाला. हा आजार एका दिवसात होत नाही. सरकारी कर्मचारी २४ तास नोकरीवर असतो, निलंबित असला तरी त्याला अशा काळात सर्व फायदे देणे बंधनकारक आहे, असे ‘मॅट’ने स्पष्ट केले.सरकारचे कान टोचलेडॉ. जानू यांनी दहा वर्ष विलंबाने प्रकरण दाखल केल्याच्या मुद्याकडे शासनाच्यावतीने सादरकर्ता अधिकारी क्रांती गायकवाड यांनी लक्ष वेधले. मात्र तुम्ही त्याच वेळी जबाबदारी घेऊन योग्य कार्यवाही केली असती तर डॉ. जानू यांना ‘मॅट’मध्ये येण्याची गरज भासली नसती, अशा शब्दात न्या. कुºहेकर यांनी सरकारी पक्षाचे कान टोचले.

टॅग्स :Courtन्यायालय