‘मेडिकल’ कर्मचाऱ्यास मारहाण

By Admin | Updated: July 31, 2015 00:15 IST2015-07-31T00:15:24+5:302015-07-31T00:15:24+5:30

अपघातात जखमीला शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर मदतीसाठी कुणीच पुढे येत नसल्याने वाद झाला. यातूनच कक्षसेवकाला मारहाण करण्यात आली.

'Medical' assaulting the employee | ‘मेडिकल’ कर्मचाऱ्यास मारहाण

‘मेडिकल’ कर्मचाऱ्यास मारहाण

संयमाचा बांध फुटला : जखमीला मदत करणाऱ्यावर गुन्हा दाखल
यवतमाळ : अपघातात जखमीला शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर मदतीसाठी कुणीच पुढे येत नसल्याने वाद झाला. यातूनच कक्षसेवकाला मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता घडली. कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
भारी येथे ट्रकच्या धडकेत जखमी व्यक्तीस नागपूर येथून येत असलेले दिलीप रामबाबू जयस्वाल, अंशुन दिलीप जयस्वाल (रा. नागपूर) यांनी आपल्या वाहनातून उपचारासाठी शासकीय रुग्णालयत आणले. जखमीला बाहेर काढण्यास कोणीच पुढे येताना दिसत नव्हता. जयस्वाल यांनी कार्यरत डॉक्टरकडे मदत मागीतील. मात्र त्यांनीही प्रतिसाद दिला नाही. दरम्यान, कक्षसेवक उपाध्याय हा रुग्णाला स्ट्रेचरवरून दुसऱ्या वॉर्डात घेऊन जात होता. जयस्वाल यांनी या कक्षसेवकाला थांबवून जखमीस गाडीबाहेर काढण्याचा आग्रह धरला. यातून वाद होऊन जयस्वाल व त्यांच्या मुुलांनी कक्ष सेवकाला मारहाण केली. कर्मचाऱ्यांनी जयस्वाल पिता पुत्राला शहर पोलीस ठाण्यात आणले. त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. यावेळी उपअधीक्षक डॉ. चेतन जनबांधे, अविनाश जानकर, भास्कर झळके, मुकेश ब्राम्हणे, राजू शहाडे, सुधाकर वैद्य, किशोर पाढेन, सुनील वडतकर, गणेश चौधरी, चंद्रशेखर गुज्जलवार, कृपाल कलेशिया, लक्ष्मण मुदलीयार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'Medical' assaulting the employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.