यांत्रिक युगातही बैलांची मागणी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 21:19 IST2019-03-13T21:18:56+5:302019-03-13T21:19:49+5:30

आजच्या यांत्रिक युगात शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी बैलांद्वारेच शेतीची कामे केली जात आहे. सध्या कळंब येथे सुरू असलेल्या बैलबाजारात शेतकऱ्यांचा कल बैलजोडी खरेदीकडे दिसून येत आहे.

In the mechanical age bullock's demand continued | यांत्रिक युगातही बैलांची मागणी कायम

यांत्रिक युगातही बैलांची मागणी कायम

ठळक मुद्देकळंबचा बैलबाजार फुलला : खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, ठिकठिकाणच्या जोड्या दाखल

गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : आजच्या यांत्रिक युगात शेतीसाठी यंत्राचा वापर वाढला आहे. तरीही काही ठिकाणी बैलांद्वारेच शेतीची कामे केली जात आहे. सध्या कळंब येथे सुरू असलेल्या बैलबाजारात शेतकऱ्यांचा कल बैलजोडी खरेदीकडे दिसून येत आहे.
उन्हाळ्याची चाहुल लागली की बळीराजा मशागतीच्या कामाला लागतो. तेव्हा त्याला प्रकर्षाने बैलांची आठवण होते. बैलाचे काम यंत्र करीत असले तरी, सर्वच कामे यंत्राच्या साह्याने शक्य नाही, ही वास्तविकता आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या दारी एक जोडी का होईना बैल ठेवतोच. कळंब येथील बैलबाजारात देवळी, बाभूळगाव, वीरखेड, वर्धा, तळेगाव, राळेगाव आदी प्रमुख गावातील दावणा (बैल) आहेत. बाजारात बैल घेणे, विकणे आणि अलटीपलटी या तीन प्रकारात व्यवहार केला जातो.
येथील बैलबाजारात बैलजोडी कमीतकमी ६० हजार आणि जास्तीतजास्त दोन लाख किंमत असणारी आहे. बैलबाजाराच्या निमित्ताने बैलांना नाल ठोकणारे, शिंगे शिलणाऱ्या, चारा विकणार, हॉटेल व्यावसायिक लोकांना चांगला रोजगार उपलब्ध झालेला आहे. राहुटी करून शेतकरी बैलासोबतच (दावण) मुक्कामाला असतो.
बैलाच्या किमतीनुसार कमिशन
बैलबाजारात जास्तीतजास्त व्यवहार दलालामार्फतच होतो. दलालाविना सौदा शक्यतो पूर्ण होत नाही, असा अनुभव आहे. परस्पर सौदा करणाऱ्याची दिशाभुल करुन त्यांना बिचकविल्या जाते. दलाल बैल घेणारा व विकणाऱ्याकडून बैलाच्या किमतीनुसार कमीशनची मागणी करतो, तर दुसरीकडे बैलबाजार हर्रास घेणाराही बैलाप्रमाणे फीची आकारणी करतो. बाजारात बैल घेणाऱ्यांसोबतच बैल पाहणाऱ्यांचीही गर्दी असते. काही बैलजोड्या फारच देखण्या आहे. यावर्षी पाहिजे तशी बैल खरेदी-विक्री झाली नसल्याची माहिती आहे. तरीही बैल घेण्याची शेतकºयांची इच्छा लपून राहत नाही, हे दिसून येते.

Web Title: In the mechanical age bullock's demand continued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.