एमसीव्हीसी तासिका शिक्षकांना मुदतवाढ नाकारली

By Admin | Updated: March 30, 2015 02:04 IST2015-03-30T02:04:59+5:302015-03-30T02:04:59+5:30

उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील घड्याळी तासिकेवरील शिक्षकांना यावर्षी मुदतवाढ नाकारण्यात आली आहे.

MCVC Thackeray declined teachers for an extension | एमसीव्हीसी तासिका शिक्षकांना मुदतवाढ नाकारली

एमसीव्हीसी तासिका शिक्षकांना मुदतवाढ नाकारली

यवतमाळ : उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमातील घड्याळी तासिकेवरील शिक्षकांना यावर्षी मुदतवाढ नाकारण्यात आली आहे. त्यामागे शैक्षणिक पात्रतेत झालेला बदल हे प्रमुख कारण देण्यात आले असून शिक्षकांची ही तासिका बंद पडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई अंतर्गत उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमासाठी इंग्रजी, मराठी व जनरल फाऊंडेशन कोर्स या विषयासाठी घड्याळी तासिकेप्रमाणे नेमणुका केल्या जात होत्या. या शिक्षकांना प्रत्येक विषयाचे वर्षभरात १२० पिरेड घेवून आपला १०० गुणांचा कोर्स पूर्ण करणे बंधनकारक होते. आधीच रोहयोच्या मजुराच्या अर्धेही मानधन दिले जात नसताना आता तेही बंद करण्यात आले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालकांनी या शिक्षकांच्या पदांना मान्यता देवू नये, असा आदेश काढला आहे. जिल्हास्तरावर शिक्षकांनी मुदतवाढीसाठी दिलेले प्रस्ताव परत पाठविले आहे. दरवर्षी नव्या शिक्षकांची नेमणूक करावी, नवीन शिक्षक असेल तरच पदांना मान्यता मिळेल आणि त्यांचे देयक निघेल, असे आदेश संचालकांनी जारी केले. अभ्यासक्रमात संगणकाचा अंतर्भाव त्यात करण्यात आला. पर्यायाने शिक्षकालाही संगणकीय ज्ञान असावे, अशी अट आहे. यामुळे शिक्षक बेरोजगार होणार असून बारावीच्या प्रश्नपत्रिका तपासणीतही अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: MCVC Thackeray declined teachers for an extension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.