शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

एसडीओ-तहसीलदारांच्या अनेक बदल्यांना ‘मॅट’चा ‘स्टे’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 16:45 IST

MAT Yawatmal News राज्य शासनाने १ ऑक्टोबर रोजी केलेल्या उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बहुतांश बदल्या वादात सापडल्या आहेत. या बदली आदेशाला कित्येकांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले.

ठळक मुद्देमुंबई, औरंगाबादमध्ये दिलासाविदर्भात मात्र अधिकारी अद्याप प्रतीक्षेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य शासनाने १ ऑक्टोबर रोजी केलेल्या उपजिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या बहुतांश बदल्या वादात सापडल्या आहेत. या बदली आदेशाला कित्येकांनी ‘मॅट’मध्ये आव्हान दिले. त्यात मुंबई व औरंगाबाद येथे दिलासा मिळाला. विदर्भात मात्र अद्याप महसूल अधिकारी हा दिलासा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आता मुंबई व औरंगाबादचे निकालपत्र जोडून नागपूर ‘मॅट’मध्ये दिलासा मिळविण्याचा प्रयत्न होतो आहे.राज्यात सुमारे दीडशे तहसीलदार व उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या. मात्र या बदल्यांनंतर महसूल प्रशासनात रोष दिसून आला. बदली केलेला व बदलीवर येणारा हे दोन्ही अधिकारी बदलीस पात्र नसल्याचे आढळून आले. एकूणच राजकीय सोईने या बदल्या केल्या गेल्याचे दिसून येते. त्यासाठी विनंती बदलीचा आधार घेतला गेला.

मुंबई ‘मॅट’मध्ये चौघांना स्थगनादेशमुंबई ‘मॅट’च्या चेअरमन मृदुला भाटकर यांनी ८ ऑक्टोबर रोजी दिनेश पारगे तहसीलदार गडहिंगलज कोल्हापूर, विजया पांगारकर उपजिल्हाधिकारी गडहिंगलज, अरुणा गायकवाड उपजिल्हाधिकारी भूसंपादन कृष्णाखोरे सोलापूर आणि गमन गावीत तहसीलदार मुरुळ जंजीर जि. रायगड या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थागनादेश दिला. अ‍ॅड. अरविंद बांदिवडेकर यांंनी त्यांची बाजू मांडली. आता ५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार आहे. त्यांना उपरोक्त अधिकाऱ्यांना आपल्या पूर्वीच्या जागी काम करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांच्या जागेवर परस्पर रुजू झालेल्या अनुक्रमे रामलिंग चव्हाण, बाबासाहेब वाघमोडे, श्रावण क्षीरसागर व लता गुरव या अधिकाऱ्यांची व्यवस्था शासन करेल असेही नमूद केले गेले. बदली झालेले हे चारही अधिकारी नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

नागरी सेवा मंडळाच्या यादीत नाव नाहीहे अधिकारी बदलीस पात्र नाही, नागरी सेवा मंडळाच्या यादीत नाव नाही, विनंती बदली असेल तर नव्या अधिकाऱ्याला नेमक्या त्याच ठिकाणी का द्यावे याचे कारण नमूद नाही, रेकॉर्ड चांगले आहे, तक्रारी नाहीत आदी मुद्दे अ‍ॅड. बांदिवडेकर यांनी उपस्थित करून महसूल विभागाने आपल्या मंत्री व मुख्यमंत्र्यांना या बदल्यांबाबत अंधारात ठेवल्याचे म्हटले आहे.

चेअरमन म्हणाल्या, हा प्रकार गंभीररिक्तपदी नियुक्ती म्हटले असले तरी प्रत्यक्षात त्या जागा रिक्त नाहीत, ही बाब निदर्शनास आणून दिली गेली. ‘मॅट’नेही हा प्रकार गंभीर आहे, या बदल्या नियमबाह्य ठरतात असा ठपका ठेवून चारही अधिकाऱ्यांना ‘स्टे’ देत दिलासा दिला.

टॅग्स :Maharashtra Administrative Tribunal महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण नागपूर खंडपीठ