शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

मातोश्री वीणादेवी दर्डा स्मृतिदिनी विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:29 PM

मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

ठळक मुद्देगुरूवार १९ जुलै : आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण, भजन व भावगीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी आदरांजली सभा, शैक्षणिक साहित्य वितरण आणि भजन व भावगीत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमतचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या सहचारिणी मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरुवार, १९ जुलै रोजी सकाळी ९.३० ते १०.३० या वेळात आदरांजली सभेचे आयोजन येथील प्रेरणास्थळ येथील मातोश्री वीणादेवी दर्डा यांच्या समाधीस्थळी करण्यात आले आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता नगरपरिषद शाळांमधील वर्ग १ ते ५ च्या सर्व एक हजार २०० विद्यार्थ्यांना जवाहरलाल दर्डा फाऊंडेशनच्यावतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण केले जाणार आहे. मातोश्री दर्डा सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष माधुरीताई आडे, यवतमाळच्या नगराध्यक्ष कांचनताई चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, नगरपरिषद शिक्षण सभापती नीता केळापुरे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिल अढागळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर, नगरपरिषद शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी योगेश डाफ उपस्थित राहणार आहे.त्याच दिवशी सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळात मातोश्री दर्डा सभागृहात वीणादेवी दर्डा यांच्या स्मृतिदिनानिमित्त भजन व भावगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अमोलकचंद महाविद्यालयाचे संगीत विभाग प्रमुख तथा प्रसिद्ध गायक प्रा.डॉ.राहुल एकबोटे आणि त्यांचा संच गीत गायन करतील. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन जवाहरलाल दर्डा फाऊंडेशन व लोकमत परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.