मातोश्री वीणादेवी दर्डा यांना आदरांजली
By Admin | Updated: July 20, 2014 00:09 IST2014-07-20T00:09:17+5:302014-07-20T00:09:17+5:30
स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पत्नी मातोश्री वीणादेवी दर्डा यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आदरांजली

मातोश्री वीणादेवी दर्डा यांना आदरांजली
यवतमाळ : स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या पत्नी मातोश्री वीणादेवी दर्डा यांना त्यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शनिवारी आदरांजली वाहण्यात आली.
बाबूजींचे समाधीस्थळ असलेल्या प्रेरणास्थळ येथे वीणादेवी दर्डा यांच्या समाधीवर अनेक चाहत्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी दोन मिनिटे मौन पाळून आदरांजली वाहण्यात आली.
या प्रसंगी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा, राज्याचे शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार वामनराव कासावार, यवतमाळच्या आमदार नंदिनी पारवेकर, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आमदार संजय राठोड, माजी आमदार कीर्ती गांधी, अॅड. ए.पी. दर्डा,
लोकमतचे यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, लव दर्डा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. (वार्ताहर)