शहरं
Join us  
Trending Stories
1
२०४७ पर्यंतचा विकासाचा रोडमॅप, व्हिजन डॉक्युमेंटचा मसुदा मंजूर, CM फडणवीस स्वतः घेणार आढावा
2
आजचे राशीभविष्य २१ ऑक्टोबर २०२५ : धनप्राप्ती होईल, लक्ष्मी पुजनाच्या दिवशी कोणाच्या राशीत काय लिहिलेय...
3
लष्करातील समन्वयामुळे पाकिस्तानने गुडघे टेकले; PM मोदी यांचे भारतीय सैन्याबद्दल कौतुकोद्गार
4
भारत नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनाच्या उंबरठ्यावर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विश्वास
5
आता उद्धव ठाकरे म्हणाले... मी पुन्हा येईन, महापालिकेवर भगवा फडकवीन; मतांची चोरी पकडली
6
'हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं'... डायलॉग अजरामर करणारे अभिनेते असरानी कालवश
7
महसूलमधील ‘पदोन्नती’चा अनुशेष तीन महिन्यांत भरणार; ४७ अधिकाऱ्यांना पदोन्नतीची दिवाळी भेट
8
महाराष्ट्र देशात अव्वल; पण ‘माहितीचा अधिकार’ अधांतरी, चार लाखांहून अधिक अपिले रखडली
9
बिहार निवडणूक २०२५: काँग्रेसची विचित्र स्थिती, उमेदवारी वाटपात गोंधळ; जुनी पोस्ट व्हायरल, अन्…
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिली पुन्हा धमकी; रशियाकडून तेल आयात थांबवा अन्यथा...
11
मुंबईमध्ये दिवाळीच्या धामधुमीत ३ दिवसांत आगीच्या २५ घटना; वाहन बॅटरीचा स्फोट, एकाचा मृत्यू
12
ऐन दिवाळीत थंडी गायब; अजून काही दिवस उष्म्याचे, इतक्यात तरी पारा घसरायची चिन्हे नाहीत! 
13
लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला चांदी एक हजाराने स्वस्त; सोनेही घटले 
14
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
15
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
16
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
17
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
18
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
19
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
20
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा

घरफोडींचा अभियंता मास्टरमार्इंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2019 06:00 IST

या आरोपींनी घरफोडीच्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात नेर शहरातील २०१७ मध्ये केलेल्या घरफोडीतील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय बॅटऱ्यासुद्धा जप्त केल्या. हे सर्व आरोपी अतिशय कुख्यात असून अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होते. यातील मास्टर मार्इंड अमजद खान याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.

ठळक मुद्दे१४ लाखांचा मुद्देमाल। ११८ काडतूस, ६ पिस्टल, ७ तलवारी, १७ चाकू

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : बिहार, हरियाणा या राज्यांसह विविध जिल्ह्यातील कुख्यात आरोपींना एकत्र करुन घरफोडीचे सत्र सुरू केले. या टोळीचा मास्टर मार्इंड सिव्हील इंजिनिअर असलेला युवक निघाला. त्याने पुसदमध्ये आपला अड्डा तयार करुन घातक शस्त्रांचा साठा जमा केला. पुसदमध्ये चोरट्यांनी गोळीबार केल्याची घटना झाल्यानंतर पोलिसांनी सर्वच बाजूने तपास सुरू केला. यातून ही अट्टल टोळी हाती लागली.अमजद खान सरदार खान (२८) रा. पुसद असे या टोळीच्या मास्टर मार्इंडचे नाव आहे. देव ब्रम्हदेव राणा (२२) रा. डुबोली ठाणा कापाशेडा जि. रोहतक हरियाणा, मोहंमद सोनू मोहंमद कलाम (१९) रा. कलासन जि. मधेपुरा बिहार या दोघांना खास घरफोड्यांसाठी पुसदमध्ये आणले. यांच्यासोबतच मोहंमद आफीस मोहंमद अफजल (२७) रा. सुभाषनगर दिग्रस, सागर रमेश हसनापुरे (२२) रा. मंगरुळ दस्तगीर ता. धामणगाव जि. अमरावती, लखन देविदास राठोड रा. मोरगव्हाण ता. दारव्हा यांना सोबत घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १३ डिसेंबरला पुसद शहरातील अनुप्रभा हॉटेलसमोर असलेल्या एका घरात धाड घातली. त्या ठिकाणी अमजद खान याच्यासह तिघे जण सापडले. त्यांच्याकडून सहा देशी बनावटीचे गावठी कट्टे व ११८ राऊंड मिळाले. त्यानंतर दिग्रस शहरातील शंकर टॉकीज चौक परिसरातून मोहंमद आसीफ याच्यासह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडेही एक देशी पिस्टल, तीन काडतूस, १७ धारदार चाकू, सात तलवारी असा शस्त्रसाठा मिळाला. याच टोळीसोबत काम करणाऱ्या लखन राठोड याला पुसदमध्ये अटक केली. त्याने २२ दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यातील १२ मोटरसायकली यवतमाळ जिल्ह्यातील आहे. तर वाशिम व बुलडाणा येथूनही दुचाकी चोरल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.या आरोपींनी घरफोडीच्या आठ गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यात नेर शहरातील २०१७ मध्ये केलेल्या घरफोडीतील ५३ ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले. याशिवाय बॅटऱ्यासुद्धा जप्त केल्या. हे सर्व आरोपी अतिशय कुख्यात असून अनेक दिवसांपासून पोलिसांना चकमा देत होते. यातील मास्टर मार्इंड अमजद खान याने अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. त्याच्या भावानेसुद्धा पॉलिटेक्नीक केले आहे. या दोघांवरही पुसदमध्ये गुन्हे दाखल आहे.अमजदवर ३०७ चा गुन्हा आहे. तर त्याच्या भावाकडून दराटीमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. या दोघांनीही चोरट्यांची टोळी तयार केली. त्यासाठी बिहार, हरियाणा, पुसद, नांदेड, दिग्रस, नेर, दारव्हा येथील सक्रिय गुन्हेगारांना एकत्र आणले. पुसद शहराच्या मध्यवर्ती भागात भाड्याने रुम करून त्यांना ठेवले जात होते. अमजद खान याचा एकमेव व्यवसाय हा घरफोडी, चोरी, लुटपाट करणे हाच आहे. यातूनच त्याने पुसदमध्ये आलिशान घरही बनविले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंद्दमवार यांच्या पथकाने केली. त्यांच्यासोबत गोपाल वास्टर, गजानन धात्रक, गजानन डोंगरे, मुन्ना आडे, पंकज पातुरकर, उल्हास कुरकुटे, हरिश राऊत, विशाल भगत, कविश पाळेकर, मो.ताज मो. जुनेद, किशोर झेंडेकर, नागेश वास्टर, पंकज बेले, प्रवीण कुथे, दिग्रस ठाण्यातील नितीन वास्टर, अरविंद कोकाटे हे कर्मचारी होते. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, पुसदचे सहायक पोलीस अधीक्षक अनुराग जैन, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरस्कर यांच्या मार्गदर्शन करण्यात आली.पेट्रोल पंप व खासगी हॉस्पिटलची टोळीने केली होती रेकीसराईर गुन्हेगारांना घेऊन अमजद खान याने अनेक गुन्हे केले आहेत. मागील काही दिवसांपासून ही टोळी पुसद शहरातील एका पेट्रोल पंपवर वॉच ठेऊन होती. त्यांनी एक-दोनदा तेथे रेकीसुद्धा केली. त्यासोबतच पुसदमधील खासगी हॉस्पिटलच्या कॅशवर या टोळीचा डोळा होता. मोठी रोकड या हॉस्पिटलमधून हलविली जाते. त्यांच्या वाहनावर ही टोळी घात लावून बसली होती. मात्र सुदैवाने तत्पूर्वीच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीचा माग काढून त्यांना जेरबंद केले. या टोळीतील आणखी काही सदस्य फरार आहेत. त्याचा शोध सुरू आहे. टोळीकडून यवतमाळ जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यांमधील गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. आठ दिवसापूर्वी या टोळीने हैदराबादमध्येही मोठा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांकडून वर्तविला जात आहे. या टोळीकडून पोलीस कोठडीत आणखी गुन्हे व मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहे.

टॅग्स :ThiefचोरPoliceपोलिस