पुसद येथे शिवपर्वात भरगच्च कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:06+5:30
राजमाता जिजाऊ परिसर स्व.शेषेराव पाटील जिनिंग व प्रेसिंग संस्थेच्या प्रांगणात शिवपर्वाचे आयोजन तसेच १९ फेब्रुवारीला ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपूजन, श्री शिवाजी विद्यालय येथून सकाळी १० वाजता मोटारसायकल रॅली व शोभायात्रा निघणार आहे.

पुसद येथे शिवपर्वात भरगच्च कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसदच्यावतीने ११ ते १७ फेब्रुवारी दरम्यान शिवपर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून हे पर्व साजरे होत आहे.
राजमाता जिजाऊ परिसर स्व.शेषेराव पाटील जिनिंग व प्रेसिंग संस्थेच्या प्रांगणात शिवपर्वाचे आयोजन तसेच १९ फेब्रुवारीला ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवपूजन, श्री शिवाजी विद्यालय येथून सकाळी १० वाजता मोटारसायकल रॅली व शोभायात्रा निघणार आहे.
११ फेब्रुवारी रोजी माजी मंत्री मनोहरराव नाईक यांच्या हस्ते शिवपर्वाचे उद्घटन होणार आहे. अध्यक्षस्थानी भारती मैंद पतसंस्थेचे अध्यक्ष अॅड.आप्पाराव मैंद राहणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार इंद्रनील नाईक, आमदार अॅड.नीलय नाईक, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार अॅड.अनंतराव देवसरकर, डॉ.एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, नगराध्यक्ष अनिता नाईक उपस्थित राहणार आहे.
शिवपर्वात १२ फेब्रुवारीला ‘संतांचे विचार आजच्या काळाची गरज’ या विषयावर हभप मधुकर महाराज बारुळकर यांचे व्याख्यान, १३ ला ‘लढाया पलिकडील शिवराय’ या विषयावर डॉ.बालाजी जाधव यांचे व्याख्यान, १४ ला ‘छत्रपती शिवाजी महाराज व आजची लोकशाही’ गंगाधर बनबरे यांचे व्याख्यान होणार आहे. १५ ला ‘छत्रपती शिवराय द ग्रेटेस्ट सोअर्स आॅफ मार्इंड पॉवर डेव्हलपमेंट’ या विषयावर कोल्हापूर येथील डॉ.विठल कोतेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. १६ ला शाहीर डॉ.राजीव चव्हाण हे शाहिरी जलसा सादर करणार आहेत. १७ फेब्रुवारीला राजमाता जिजाऊ चित्रपटाच्या अभिनेत्री प्राचार्या डॉ.स्मिता देशमुख यांचे ‘जिजाऊंचे विचार आणि आजच्या काळाची गरज’ या विषयावर महिलांना प्रबोधन करणार आहेत. हे सर्व कार्यक्रम सायंकाळी ६.३० वाजता स्व.शेषेराव पाटील जिनिंग व प्रेसिंग परिसरात होत आहे.
पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांच्या प्रमुख मार्गदर्शनात कार्यरत छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीच्यावतीने आयोजित सर्व उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ.गणेश पाटील, कार्याध्यक्ष अॅड.भारत जाधव, उपाध्यक्ष शेख कयूम, प्रवीण कदम, सचिव नितीन पवार, सहसचिव सुरेश धनवे, कोषाध्यक्ष अमोल व्हडगिरे, शिवपर्व प्रमुख राजू साळुंके, शोभायात्रा समिती प्रमुख अजय क्षिरसागर, शिवसामान्य स्पर्धा प्रमुख चंद्रकांत ठेंगे, मोटारसायकल रॅली प्रमुख अभिजित पानपट्टे आदींनी केले आहे.