शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमामुळे बिघडला संसार, पतीने मागितला घटस्फोट, प्रियकराने केले दूर; कोर्टात घडला भयंकर प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2022 14:44 IST

पती व प्रियकराने पाठ फिरविल्याने महिला संतप्त

यवतमाळ : येथील जिल्हा न्यायालयातील आठ क्रमांकाच्या न्यायालयासमाेर महिलेने पूर्वाश्रमीच्या प्रियकरावर कटरने हल्ला केला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. हा प्रकार घडला तेव्हा काेर्ट पैरवी अधिकारी तेथे उपस्थित असल्याने माेठा अनर्थ टळला. त्यांनी शहर पाेलिसांना पाचारण करून हल्ला करणाऱ्या महिलेला त्यांच्या ताब्यात दिले. दरम्यान, हल्ल्याची वार्ता पसरताच त्या परिसरात गर्दी जमा झाली हाेती.

विशाल माराेतराव शेंडे (४५, रा. शिंदेनगर, यवतमाळ) असे जखमीचे नाव आहे. हल्ला करणाऱ्या महिलेचे विशालसाेबत प्रेमसंबंध हाेते. दरम्यान, त्याचे संबंध महिलेच्या पतीला माहीत झाले. त्यामुळे महिलेविराेधात पतीने घटस्फाेटाचा खटला दाखल केला. तर दुसरीकडे विशालसाेबतही महिलेचा वाद झाला. यातून त्या दाेघांनी परस्परांविराेधात तक्रारी दाखल केल्या.

या प्रकरणात आठ क्रमांकाच्या न्यायालयात सुनावणी हाेती. न्यायालयासमाेर उभी असताना महिला अचानक संतप्त झाली आणि तिने स्वत:जवळ असलेल्या कटरने विशाल शेंडे याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा वार विशालच्या गालावर लागला. तेथे उपस्थित काेर्ट पैरवी रमेश उघडे यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखाेर महिलेला ताब्यात घेतले. तेथे महिला पाेलिस पाेहाेचली, त्यामुळे पुढची घटना टळली.

या घटनेनंतर तेथे बघ्यांची गर्दी जमा झाली. घटनेची माहिती शहर पाेलिसांना देण्यात आली. पाेलिसांनी महिलेला ताब्यात घेतले. तर जखमी विशाल याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. शहर पोलिसांनी महिला व तिच्या पतीविरोधात प्राप्त तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही परस्परांविरोधात गुन्हे नोंद असून प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीYavatmalयवतमाळhusband and wifeपती- जोडीदारCourtन्यायालय