शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:39 IST

गत आठवडाभरापासून ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेली यवतमाळची बाजारपेठ रविवारी दिवाळीच्या खरेदीने अक्षरश: फुलून गेली.

ठळक मुद्देनोकरदारांची बंपर खरेदी : आठवडी बाजारात गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गत आठवडाभरापासून ग्राहकांच्या प्रतीक्षेत असलेली यवतमाळची बाजारपेठ रविवारी दिवाळीच्या खरेदीने अक्षरश: फुलून गेली. बाजार ओळीसह दुकानातही पाय ठेवायला जागा नव्हती. नोकरदार आणि चाकरमाण्यांनी बंपर खरेदी केली. तर आठवडीबाजारात ग्रामीण भागातील नागरिकांनी गर्दी केली होती.गत काही दिवसांपासून बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. दिवाळीच्या सणासाठी व्यावसायिकांनी आपली दुकाने विविध साहित्यांनी सजवून ठेवली होती. कापड, किराणा, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, मोबाईल यासह प्रत्येक दुकानात मोठ्या प्रमाणात साहित्य विक्रीसाठी आणले होते. परंतु ग्राहक फिरकता फिरकत नव्हते. मात्र नोकरदारांचा पगार आणि दिवाळी तोंडावर येताच रविवारी यवतमाळच्या बाजारापेठेत चैतन्य आले. मुख्य बाजारपेठेसह विविध रस्त्यांवर खरेदीदार नागरिकांची गर्दी दिसत होती. अनेक जण सहकुटुंब खरेदीचा आनंद घेत होते. इंदिरा गांधी मार्केटमध्ये प्रत्येक दुकानात पाय ठेवायलाही जागा नव्हती. रस्त्यावरही मोठी गर्दी दिसत होती. मेनलाईनमध्येही रविवारी खरेदीदारांच्या गर्दीचे दृश्य पहावयास मिळाले. साडी, रेडिमेड कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू यासह रांगोळी, फटाके, पणत्या, लक्ष्मीची मूर्ती, प्रसादाचे साहित्य खरेदी करण्याची लगबग सुरू होती.शहराच्या गर्दीसोबतच दिवाळीचा आठवडी बाजाराही चांगलाच फुलला होता. ग्रामीण भागातून आलेले नागरिक दिवाळीच्या खरेदीचा आनंद लुटत होते.शेवटच्या दोन दिवसात गर्दी वाढणाररविवारी बाजारात सर्वाधिक गर्दी नोकरदारांची होती. बोनस आणि वेतन मिळाल्याने नोकरदार बंपर खरेदी करताना दिसत होते. दिवाळीत प्रत्येक जण थोडी थोडकी का होईना खरेदी करतात. त्यामुळे सोमवार, मंगळवार या दोन दिवसात आणखी गर्दी वाढणार आहे. ही गर्दी कॅश करण्यासाठी व्यावसायिकही सज्ज झाले आहे. अनेक व्यावसायिकांनी आकर्षक योजना ग्राहकांसाठी सुरू केल्या आहेत.