शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

बाजार समितीचे गतवैभव नष्ट

By admin | Updated: June 5, 2014 00:03 IST

येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही.

नीलेश यमसनवार - पाटणबोरीयेथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीचे गतवैभव आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. व्यापारी आणि हमालांच्या मुजोरीमुळे शेतकरी आता या बाजार समितीकडे फिरकण्यासच तयार नाही. यापूर्वी येथील बाजार समिती परिसरात प्रसिध्द होती. येथे परिसरातील शेतकरी बांधव मोठय़ा प्राणामात आपला शेतमाल विक्रीसाठी आणायचे. मोठय़ा प्रमाणात या बाजार समितीत तूर, ज्वारी, चना विक्रीसाठी यायचा. त्यामुळे बाजार समिती गजबजून राहायची. बाजार समितीच्या प्रांगणात बैलंडी, वाहनांची गर्दी दिसायची. परिणामी रात्री दोन वाजतापर्यंत काटा सुरू राहायचा. मात्र आता येथील काही हमालांच्या लुटीमुळे आणि काही व्यापार्‍यांच्या चुकीच्या धोरणामुळे, बाजार समितीचे गतवैभव नष्ट होत आहे.येथील व्यापार्‍यांनी आता शेतकर्‍यांचा विश्‍वासच गमविला आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी आता आपला शेतमाल पाटणबोरी येथे न आणता हिंगणघाट, पांढरकवडा, आदिलाबाद येथे तो विक्रीस नेत आहेत. बाजार समितीचे अनेक गोदामही संरक्षणाअभावी पडीत आहे. त्यांना संरक्षण नसल्याने तूर व चना खरेदीधारक गोदामात माल ठेवत नाही. बाजार समितीचे गोदाम गावाबाहेर असल्याने नेहमी तेथे चोर्‍याही होतात. त्यामुळे हे गोदाम असुरक्षित झाले आहे. तेथे व्यापारी आणि शेतकरी या दोघांनाही आपला माल ठेवणे कठीण झाले आहे.बाजार समितीच्या पाण्याच्या मोटारपंपावर कर्मचार्‍याचे नियंत्रण नाही. त्यामुळे येथील पाण्याचा वापर परिसरातील नागरिक भांडे, कपडे धुणे, दुचाकी, चारचाकी वाहन धुण्याकरिता करीत असतात. उपबाजार समितीचा दूरध्वनी तर नेहमीच बंद असतो. तो कधीच लागत नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी माहिती कुणाकडे विचारावयाची, असा प्रश्न पडतो.  उपबाजार समितीच्या परिसरात कुणीही भटकत नसल्याने हा परिसर आता अवैध व्यवसायाचे केंद्रस्थान बनला आहे. व्यापारीही परस्परच खरेदी करीत असल्याने शेतकरी बाजार समितीत येत नाही. त्यासाठी व्यापार्‍यांनी गावात ठिकठिकाणी आपले खरेदीचे ठिय्ये तयार केले आहे. तेथेच ते शेतमाल खरेदी करतात. त्यामुळे समितीच्या ‘सेस’चे प्रचंड नुकसान होते. बाजार समितीच्या कर्मचार्‍यांना प्रति गाडी थोडी ‘चिरीमिरी’ देऊन व्यापार्‍यांनी बाहेरच शेतमाल खरेदीचा अधिकार मिळविल्याने बाजार समिती ओस पडत आहे. व्यापारी परस्पर खरेदी करीत असल्याने शेतकर्‍यांचा शेतमाल ‘झिरो’मध्येच खरेदी केला जातो. त्यामुळे बाजार समितीचे ‘सेस’चे लाखो रूपयांचे नुकसान होते. त्यातून केवळ व्यापारीच गब्बर बनत आहे. शेतकरी मात्र लुटला जात आहे. बळीराजा या सर्व बाबींमुळे हतबल झाला आहे. मात्र त्याला नाईलाजाने सर्व बाबी सहन कराव्या लागत आहे. बाजार समिती व्यवस्थापनाचे व्यापार्‍यांवर कोणतेही नियंत्रण नसल्याने शेतकरीच भाव व वजन फरकाने नागविला जात असून त्यांची एक प्रकारे ‘लूट’ सुरू आहे.