नेहरूजींच्या यवतमाळ भेटीने अनेकांना हक्काची शेतजमीन

By Admin | Updated: November 13, 2014 23:09 IST2014-11-13T23:09:39+5:302014-11-13T23:09:39+5:30

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यवतमाळात आले. त्यांनी एक लाख ३७ हजार हेक्टर भूदानाच्या जमीनिचे वितरण केले. यामुळे हजारो भुमीहीन कुटुंबातील अंधार दूर झाला.

Many of the Yavatmal visits of Nehruji have a right to farm land | नेहरूजींच्या यवतमाळ भेटीने अनेकांना हक्काची शेतजमीन

नेहरूजींच्या यवतमाळ भेटीने अनेकांना हक्काची शेतजमीन

भूदानाच्या जमीनीचे वाटप
यवतमाळ : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यवतमाळात आले. त्यांनी एक लाख ३७ हजार हेक्टर भूदानाच्या जमीनिचे वितरण केले. यामुळे हजारो भुमीहीन कुटुंबातील अंधार दूर झाला. चाचा नेहरूंची भेट यवतमाळकरांसाठी कायम मनात घर करून गेली. या ऐतिहासीक स्थळाला यवतमाळकरांनी कायम जपले आहे.
विनोबा भावे यांनी भुदान चळवळ जिल्ह्यात राबविली. या चळवळीला गावा गावातून मोठा प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील जमिनदार आणि मोठया आसामिंनी भुदान चळवळीत जमीनी दान दिल्या. एक लाख ३७ हजार एकर शेतजमीन विनोबाजींना दानपत्रातुन मिळाली. मिळालेल्या जमीनीचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप कोणाच्या हस्ते करायचे याबाबत चर्चा झाली, अखेर देशाच्या पंतप्रधानांना बोलविण्यावर सर्वांचे एकमत झाले.
या सोहळयाकरिता गोदनी मार्गावरील खुल्या मैदानाची निवड करण्यात आली. सध्याच्या आकाशवाणी केंद्राच्या लगत १८ एप्रिल १९५९ रोजी ही सभा घेण्यात आली. याकार्यक्रमाला पंडित जवाहरलाल नेहरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रारंभी नेहरूजींची सभा झाली. ेया सभेत भूमीहीनांना जमीनीचा हक्क देण्यात आला. भुदान यज्ञ मंडळ त्यावेळी नियुक्त करण्यात आले. यामुळे भूमीहीन कुटुंबासाठी हा दिवस सुवर्णमयी होता. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भजनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या सभेत झालेले राष्ट्रसंतांचे हे भजन यवतमाळकरांसाठी अजरामर ठरले आहे. हा दिवस जिल्ह्यासाठी अविस्मरणीय असाच होता. त्याची नोंद नगर परिषदेच्या दप्तरी करण्यात आली आहे. या क्षणाची आठवण जपण्यासाठी ऐतिहासीक वास्तु म्हणून उद्यान उभारण्यात आले. गोदनी मार्गावरचे उद्यान आजही अनेकांचे लक्ष वेधुन घेते. येथील भिंतीवर भुदान सभेच्या क्षणाचे चित्रण करण्यात आले आहे. सोबत मनाला प्रसन्न करणारे उद्याण उभारण्यात आले आहे. हे स्थळ आजही पंडितजींच्या यवतमाळ भेटीची आठवण करून देते.
(शहर वार्ताहर)

Web Title: Many of the Yavatmal visits of Nehruji have a right to farm land

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.