मतपेटी बेपत्ता झाल्याने मानोली गावात गोंधळ

By Admin | Updated: July 27, 2015 01:18 IST2015-07-27T01:18:58+5:302015-07-27T01:18:58+5:30

तीन पैकी एका वॉर्डाची मतपेटी बेपत्ता झाल्याने मानोली येथे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

Manoli village confusion due to missing ballot box | मतपेटी बेपत्ता झाल्याने मानोली गावात गोंधळ

मतपेटी बेपत्ता झाल्याने मानोली गावात गोंधळ

ग्रामपंचायत निवडणूक : मतदान अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस
घाटंजी : तीन पैकी एका वॉर्डाची मतपेटी बेपत्ता झाल्याने मानोली येथे काही काळ तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. तत्काळ हालचाली होवून पेटी आढळल्याने आणि संबंधितावर कारवाईचे आश्वासन दिल्याने प्रकरण निवळले. दरम्यान, मतदान अधिकारी शैलेश मडावी यांना तहसीलदारांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शनिवार २५ जुलै रोजी मानोली ग्रामपंचायतीसाठी मतदान घेण्यात आले. या गावातील प्रभात क्र.१ ची मतदानपेटी मतदान अधिकारी शैलेश मडावी यांनी नियमाला फाटा देत मोटरसायकलने घाटंजी येथे सायंकाळी ७.३० वाजता जमा केली. तिकडे प्रभाग २ व ३ चीच मतदानपेटी दिसत असल्याने एक पेटी कुठे गेली यावरून गोंधळ उडाला. ही बाब लक्षात येताच गावकरी एकत्र आले. तहसीलदार एम.एम. जोरवर आणि घाटंजीचे ठाणेदार भरत कांबळे यांनी सदर गाव गाठून परिस्थिती नियंत्रणात आणली. अखेर मडावी यांनी केलेला प्रकार पुढे आला. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदारांनी ही पेटी रात्री मानोली येथे आणली. पेटी सुस्थितीत असल्याचे नागरिकांना दाखविण्यात आले. त्यावेळी नागरिकांनी मडावी यांच्यावर कारवाईची मागणी केली. तहसीलदारांनी दिलेल्या आश्वासनानंतर रात्री ९ वाजता प्रकरण निवळले. यावेळी मानोली येथील बाळ ठाकरे, पुंडलिक वाढई, पुरुषोत्तम शेंडे, राजू शेंडे, प्रवीण लढे, पुंजाराम पुंडे आदी उपस्थित होते.
दरम्यान, घाटंजी उपनिबंधक कार्यालयातील लिपिक तथा मतदान अधिकारी मडावी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितल्याचे तहसीलदार एम.एम. जोरवर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Manoli village confusion due to missing ballot box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.