मनोहरराव नाईक यांच्या मताधिक्यात वाढ की घट ?
By Admin | Updated: October 18, 2014 02:04 IST2014-10-18T02:04:12+5:302014-10-18T02:04:12+5:30
पुसद विधानसभा मतदारसंघासाठी १९ आॅक्टोबरला मतमोजनी असली तरी २००९ च्या तुलनेत १.६७ टक्के मतदान कमी झाले असून, यावेळी ६१.२३ टक्के मतदान झाले आहे.

मनोहरराव नाईक यांच्या मताधिक्यात वाढ की घट ?
पुसद : पुसद विधानसभा मतदारसंघासाठी १९ आॅक्टोबरला मतमोजनी असली तरी २००९ च्या तुलनेत १.६७ टक्के मतदान कमी झाले असून, यावेळी ६१.२३ टक्के मतदान झाले आहे. त्यात पंचरंगी निवडणूक झाल्याने मनोहरराव नाईकांना किती मताधिक्य मिळेल याविषयी केवळ कार्यकर्त्यांमध्येच नव्हे तर मतदारांचीसुद्धा उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
पुसद विधानसभा निवडणुकीसाठी भरघोस मतदान होईल असा आशावाद असताना केवळ ६१.२३ टक्के मतदान झाल्याने अनेकांची राजकीय गणिते चुकु लागली आहे. २००९ च्या निवडणुकीत ६२.९० टक्के मतदान झाले होते. यंदा २०१४ च्या निवडणुकीत १.६७ टक्के मतदान कमी झाले आहे. ६२ वर्षांपासून पुसद मतदारसंघावर नाईक कुटुंबीयांची एकछत्री पकड आहे. दोन दिवसात अनेक बाबी उजेडात आले. सर्व काही स्पष्ट झाले आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा, बसपासह एकूण १५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. चार वेळा आमदार राहिलेले मनोहरराव नाईक पाचव्यांदा यावेळी रिंगणात होते. काँग्रेसकडून अॅड़ सचिन नाईक , भाजपाचे वसंतराव पाटील-कान्हेरकर, सेनेचे प्रकाश पाटील देवसरकर आदींनी ही निवडणूक लढविली.
पुसद मतदारसंघात २ लाख ८१ हजार ५६१ एकूण मतदार आहेत. त्यापैकी १ लाख ७२ हजार ३८९ मतदान झाले. ही टक्केवारी ६१.२३ एवढी आहे. २००९ च्या मतदानाचा आलेख बघितला. मनोहरराव नाईक ७७ हजार १३६ मते मिळाली होती. तर सेनेच्या डॉ. आरती फुफाटे
यांना ४६ हजार २९६ मते मिळाली होती.
त्यावेळी दोन्ही काँग्रेसची आघाडी व सेना-भापाची युती होती. यावेळी मात्र सर्वजण स्वतंत्र होते. त्यामुळे मताचे मोठे विभाजन झाले. तरी सुद्धा मनोहरराव नाईकांचे पारडे जड राहणार आहे. मनोहरभाऊ ६० ते ७०
हजाराच्या मताधिक्क्याने विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
उमेदवारांना अनामत रक्कम वाचविण्यासाठी ७८ हजार ३७१ मतदान आवश्यक आहे. तेव्हा एकूण १५ उमेदवारांपैकी १२ उमेदवारांची अनामत जप्त होणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. एकंदरीत २००९ च्या निवडणुकीचा विचार केल्यास ज्यावेळी मनोहरराव नाईक यांच्या मताधिक्क्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)