मनीषा मुलकलवार यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग
By Admin | Updated: December 12, 2015 05:12 IST2015-12-12T05:12:25+5:302015-12-12T05:12:25+5:30
येथील जिजाऊ शिक्षण महाविद्यालयातील प्रा.डॉ. मनीषा मुलकलवार यांनी दुबई येथे बुधवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय

मनीषा मुलकलवार यांचा आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग
यवतमाळ : येथील जिजाऊ शिक्षण महाविद्यालयातील प्रा.डॉ. मनीषा मुलकलवार यांनी दुबई येथे बुधवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले. ‘युनिर्फार्मिटी अँड कंपेरिबिलीटी इन द ग्रेडिंग सिटिम अँड हायर एज्यूकेशन : ए लीड फॉर एक्झामिनेशन रिफॉर्म’ असा त्यांच्या शोधनिबंधाचा विषय होता. या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी भारतातील नामवंत शास्त्रज्ज्ञ पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, बनारस हिंदू विद्यापीठाचे माजी कुलगुरू व डीएनए फिंगर प्रिंटचे जनक डॉ. लालजी सिंग आदींनी मार्गदर्शन केले. या परिषदेत अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, जैविक शास्त्र, सोशल सायन्स व मॅनेजमेंट आणि पदार्थ विज्ञान या विषयावरील शोधनिबंध सादर झाले आहे. विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी आपल्या शोधनिबंधाचे वाचन केले.