मंगरुळपीरजवळ मोठा अनर्थ टळला!
By Admin | Updated: June 27, 2017 09:17 IST2017-06-27T09:17:04+5:302017-06-27T09:17:04+5:30
कठडे नसलेल्या पुलावर अधांतरी राहिली बस ; ४२ प्रवासी बचावले!

मंगरुळपीरजवळ मोठा अनर्थ टळला!
लोकमत न्यूज नेटवर्क
मंगरुळपीर : शहरालगत असलेल्या मानोरा रस्त्यावरील स्वासीन नदीवरील पुलाला कठडे नसल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस सरळ अधांतरी लटकत राहिली. यावेळी अनेकांना ह्यकाळ आला होता, पण वेळ आली नव्हतीह्ण याचा प्रत्यय सोमवारी आला. केवळ दैव बलवत्तर म्हणून एसटी बसमधील ४२ प्रवासी सुखरूप बचावले.
अकोल्याहून दिग्रसकडे जाणारी एम.एच. ४० एन-९७२० क्रमांकाची एसटी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने मनोरा रस्त्यावरील पुलाच्या कोपऱ्याला जाऊन धडकली. अर्धी बस पुलाखाली आणि अर्धी पुलावर अशा अवस्थेत बस लटकली. बसमध्ये ४२ प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही. या पुलाला कठडा नसल्यामुळे हा अपघात झाला. कठड्याच्या आवश्यकतेसंदर्भात ह्यलोकमतह्णने यापूर्वी वृत्त प्रकाशित केले आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळेच अद्याप या पुलाला कठडे लावण्यात आलेले नाहीत.