शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांपासून गुंगारा देणारा अखेर पोलिसांना मिळाला रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2021 05:00 IST

शम्मी उल्ला याने एकाच निर्घृणपणे खून केला. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१९ मध्ये त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र, पॅरोल संपली तरी तो कारागृहात परतला नाही. नेर पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते. मागील तीन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतरच तो पोलिसांच्या हाती लागला. 

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अमरावती कारागृहात जन्मठेप भोगत असलेल्या आरोपीला पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र,  तीन वर्षांपासून तो कारागृहात परतलाच नाही. नेर पोलीस सातत्याने त्याच्या मागावर होते. तरीही तो हाती लागत नव्हता. शेवटी पाय मोडल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचार घेताना पोलिसांनी त्याला अटक केली. शम्मी उल्ला अनवर खॉ पठाण (६१) रा. नबाबपूर नेर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. शम्मी उल्ला याने एकाच निर्घृणपणे खून केला. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. तो अमरावती कारागृहात शिक्षा भोगत होता. २०१९ मध्ये त्याला पॅरोलवर सोडण्यात आले. मात्र, पॅरोल संपली तरी तो कारागृहात परतला नाही. नेर पोलीस सातत्याने त्याचा शोध घेत होते. मागील तीन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्यानंतरच तो पोलिसांच्या हाती लागला. यवतमाळातील दत्त चौक परिसरातील एका अस्थीव्यंगोपचार तज्ज्ञाकडे उपचार घेण्यासाठी शम्मी उल्ला भरती झाला. १८ ऑक्टोबरला तो रुग्णालयात आला. महात्मा फुुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार मिळावा यासाठी त्याने अर्ज केला. रेशन कार्ड व आधारकार्ड रुग्ण सेवकाकडे दिले. मात्र, त्यावरील नाव अस्पष्ट असल्याने त्याला तहसीलदारांचा दाखला आणण्यास सांगितले. येथूनच शम्मी उल्ला याचा मागोवा नेर पोलिसांना मिळाला. नेर पोलिसांनी तीन वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या शम्मी उल्लाची गोपनीय माहिती गोळा करणे सुरू केले. यात तो अपघातामध्ये जखमी झाला असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी काही मोबाईल लोकेशनही ट्रेस करणे सुरू केले. यवतमाळातील दत्त चौक परिसरातील मोबाईल लोकेशन मिळत होते. नेर पोलिसांनी दत्त चौक परिसरात असलेले सर्व अस्थीव्यंगोपचार तज्ज्ञांची रुग्णालये हुडकली. बॅंक ऑफ इंडियाच्यासमोर असलेल्या येलनारे हाॅस्पिटलमध्ये शम्मी उल्ला उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी त्याला अटक करण्याचा  निर्णय घेतला. मात्र, नातेवाइकांनी विनंती व गयावया केली. शिवाय शम्मी उल्ला याचा पाय फ्रॅक्चर झाला होता. नेर पोलिसांनी मानवी दृष्टिकोनातून विचार करीत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली. पोलिसांच्या बंदोबस्तातच शम्मी उल्ला याच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. नंतर २५ ऑक्टोबरला सकाळी नेर पोलिसांनी शम्मी उल्ला याला अटक करून त्याची रवानगी अमरावती कारागृहात केली. 

गोपनीय खबर ठरली महत्त्वाची - सातत्याने गुंगारा देणाऱ्या शम्मी उल्ला याचा अपघात झाला. त्यात त्याचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. ही गोपनीय खबर पोलिसांपर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलिसांनी शम्मी उल्ला याचा शोध सुरू केला. त्याच्या प्रत्येक मिनिटाच्या हालचाली टिपण्यासाठी जवळच्या नातेवाइकांना ट्रॅक केले. यातूनच तो थेट रुग्णालयात उपचार घेतानाच नेर पोलिसांना गवसला.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस