मालखेडचे लंबू-टिंगू आकर्षणाचे केंद्र
By Admin | Updated: July 28, 2014 23:45 IST2014-07-28T23:45:36+5:302014-07-28T23:45:36+5:30
निसर्गाची किमया आगळीच आहे. यामुळे भूतलावर वेगवेगळ्या घटना घडतात. यातीलच मालखेड(खुर्द) येथील लंबू आणि टिंगू हे भावंड आकर्षणाचा केंद्र बनले आहे. तीन फूट उंचीचा संजय आणि सहा फूटाचा ज्ञानेश्वर यांना

मालखेडचे लंबू-टिंगू आकर्षणाचे केंद्र
किशोर वंजारी - नेर
निसर्गाची किमया आगळीच आहे. यामुळे भूतलावर वेगवेगळ्या घटना घडतात. यातीलच मालखेड(खुर्द) येथील लंबू आणि टिंगू हे भावंड आकर्षणाचा केंद्र बनले आहे. तीन फूट उंचीचा संजय आणि सहा फूटाचा ज्ञानेश्वर यांना पाहताच प्रत्येकजण थबकतो. या दोघांमधील वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत.
संजय ईश्वर सेजग याचे वय २३ वर्षे असले तरी त्याची उंची केवळ तीन फूट आहे. जगात अनेक बुटके असले तरी त्यांच्या वाढत्या वयानुसार शरीराच्या हालचाली आणि बोल असते. चेहऱ्यावरून त्यांचे वय लक्षात येते. मात्र संजयचा चेहरा लहान मुलासारखा असून बोल बोबडे आहे. लुंगी आणि शर्ट असा त्याचा पेहराव आहे. बुटकेपणाने त्याला त्रासही सहन करावा लागतो. इवलुशा पायाने तो व्यवस्थित चालूही शकत नाही. त्यामुळे त्याला खांद्यावर उचलून न्यावे लागते.
संजयचा लहान भाऊ ज्ञानेश्वर २० वर्षांचा असून त्याची उंची सहा फूट आहे.सध्या मालखेडचे लंबू आणि टिंगू अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू झाले आहे. दोघे एकत्र असतात तेव्हा त्यांना लंबू-टिंगू अशीच हाक मारली जाते.
या भावंडांचा परिवार विविध प्रकारचे साहित्य विकून, भविष्य सांगून उपजीविका करतात. त्यामुळे ते भटकंतीवर असतात. नाथजोगी समाजातील ही भावंड अजूनही शासनाकडून उपेक्षित आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदतीची गरज या गावातील नागरिकांनी व्यक्त केली आहे. मात्र सध्या तरी या परिवाराच्या नशिबी उपेक्षाच आहे.