शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचे उमेदवार अजित पवारांच्या पाया पडले, दादा अवघडले; पंगतीला बोलणेही टाळले
2
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 
3
'डिप्रेशनमध्ये मी तेव्हा आयुष्य संपवून टाकणार होतो'; जो बायडेन यांचा धक्कादायक खुलासा
4
IPL 2024 DC vs MI: मुंबईने टॉस जिंकला! हार्दिकने रिषभच्या मनासारखा निर्णय घेतला, पृथ्वीला विश्रांती
5
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केले ५३ पानी उत्तर, EDच्या आरोपांचा घेतला समाचार
6
' माझी कामं स्वतःच्या प्रचार पुस्तिकेत छापली'; सुप्रिया सुळेंची नक्कल करत अजित पवारांची टीका
7
सिट्रॉएन, महिंद्रानंतर होंडाची बारी; अमेझला 2019 मध्ये 4 स्टार, 2024 मध्ये दोन स्टार
8
T20 WC 2024: हर्षा भोगलेंनी निवडला भारतीय संघ; KL राहुलला वगळलं, नव्या चेहऱ्यांना संधी
9
"शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 
10
रत्नागिरी: प्रचार ऐन रंगात आला, अन् ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला तडीपारीची नोटीस
11
FD Vs NSC: नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट की ५ वर्षांची एफडी; ₹२ लाखांच्या गुंतवणूकीवर कुठे जास्त फायदा?
12
ऑनलाइन केक मागवला पण OTP देणे पडले महागात; खाते झाले रिकामे, नेमकं झालं काय?
13
काँग्रेसचा प्रचार यापुढे करणार नाही, नसीम खान यांची घोषणा; मुंबईत काँग्रेसला आणखी एक धक्का!
14
Crypto Investment : लोकांमध्ये पुन्हा Cryptocurrency ची क्रेझ, का वाढतंय आकर्षण?
15
'विशाल पाटलांबाबतची खेळी जयंत पाटलांकडून'; भाजपच्या माजी आमदाराचा खळबजनक दावा
16
एकनाथ शिंदेच जणू! महेश मांजरेकरांच्या 'जुनं फर्निचर' मधील या अभिनेत्याला ओळखलंत का?
17
Vastu Shastra: पाण्याचा माठ, टाकी घराच्या 'या' दिशेला असेल तर; पाण्यासारखा वाया जाईल पैसा!
18
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
19
Tarot Card: केलेल्या मेहनतीचे फळ मिळण्याचा काळ; टॅरो कार्डच्या मदतीने वाचा साप्ताहिक भविष्य!
20
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला

आर्णीतील अत्याचाराची उच्चस्तरीय चौकशी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 10:23 PM

आर्णीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी यवतमाळात पडसाद उमटले. सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, राजस्थानी ब्राम्हण समाज, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देसकल जैन समाजाचा निषेध मोर्चा : नराधमांना फाशी द्या, महिलांनी नोंदविला रोष

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आर्णीमध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे मंगळवारी यवतमाळात पडसाद उमटले. सकल जैन समाज, माहेश्वरी समाज, अग्रवाल समाज, राजस्थानी ब्राम्हण समाज, अखिल भारतीय विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी समाजबांधवानी काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. नराधमांना फाशी देण्याची मागणी करणारे फलक युवती आणि महिलांनी उंचावले होते. अत्याचाराची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तपास महिला पोलिसांकडे सोपविण्याची विनंती जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षकांना करण्यात आली.स्थानिक पाच कंदिल चौकातून निघालेला हा मोर्चा तिरंगा चौकात धडकला. येथे झालेल्या सभेत समाजबांधवांनी तीव्र शब्दात घटनेचा निषेध नोंदविला. अशा प्रकारच्या अत्याचाराची हिंमत कोणीही करू नये म्हणून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. आठ मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, संपूर्ण प्रकरणात आर्णी पोलिसांकडून दिरंगाई झाली आहे. या दिरंगाईला जबाबदार असणाऱ्या अधिकाºयांवर कारवाई करण्यात यावी. सामूहिक अत्याचार प्रकरणात असलेल्या कलमामध्ये दुरूस्ती करावी. अपराध्यांना जामीन मिळू नये. अल्पवयीन मुलांकडून अशा प्रकारचा अपराध घडला असेल तर बलात्काराच्या गुन्ह्याची नोंद घेण्यात यावी. या प्रकरणात महिला डीवायएसपीची नियुक्ती करण्यात यावी. न्यायालयीन कामकाजात लागणारे दस्ताऐवज पीडित कुटुंबाला तत्काळ मिळावे आदी मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले. 

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी