१४ ग्रामपंचायतींवर महिलाराज
By Admin | Updated: May 10, 2015 01:54 IST2015-05-10T01:54:41+5:302015-05-10T01:54:41+5:30
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड पार पडली असून, २२ पैकी १४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची निवड करण्यात आली.

१४ ग्रामपंचायतींवर महिलाराज
दिग्रस : तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदाची निवड पार पडली असून, २२ पैकी १४ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महिलांची निवड करण्यात आली. तर पाच ठिकाणी उपसरपंचपदावर महिलांनी बाजी मारली. दोन ठिकाणी आरक्षित प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंचपद रिक्त राहिले. तर एका ठिकाणी उपसरपंचपदासाठी नामांकनच दाखल झाले नाही.
बहुचर्चीत साखरा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लिना सुनील राठोड तर उपसरपंचपदी मनोज जयस्वाल यांची निवड करण्यात आली. आमला बु. येथे सरपंच किरण कैलास तायडे, उपसरपंच राजाभाऊ खंदारे, आष्टाच्या सरपंचपदी निर्मला जाधव तर उपसरपंचपदी हरिसिंग जाधव यांची निवड करण्यात आली. वसंतनगर येथे दौलत चव्हाण, सविता आडे, कांदळी जयश्री वंडे, हुमेश खान, वडगाव वेणु राठोड, किसन राठोड, डेहणी सुरेश ईहरे, जयवंत अंचटवार, वसंतपूर खर्डा गणेश इंगोले, राजू मोघे, राहटी लता जाधव, नारायण जाधव, रोहणादेवी पंजाब महल्ले, दर्शना इंगोले, मांडवा पंकज चव्हाण, सविता चिपडे, सावंगा बु. लक्ष्मी खडके, महादेव सप्रे, चिंचोली क्र. १ उपसरपंचपदी मंगल चव्हाण निवडून आले. परंतु अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातील सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त आहे.
विठोली येथे सरपंच सुलोचना गावंडे, उपसरपंच प्रकाश जाधव, वाई मेंढी येथे सुमित्रा डाहके, माणिक काळे, लोणी येथे उपसरपंचपदी फुलवा जाधव येथे सुद्धा अनुसूचित जमाती प्रवर्गातील महिला सदस्य नसल्याने सरपंचपद रिक्त आहे. डोळंबा येथे विनोद जाधव यांची निवड झाली. मात्र उपसरपंचपदासाठी कुणीही नामांकन दाखल केले नाही, त्यामुळे पद रिक्त राहिले. माळहिवरा येथे सरपंच ज्योती राठोड, उपसरपंच दिगंबर आगोशे, महागाव येथे प्रभूसिंग जाधव, भीमराव नाटकर, तुपटाकळी येथे सरपंचपदाच्या निवडीत भाजपा तालुकाध्यक्ष सुभाष काटेकर यांच्या पत्नी लताबाई काटेकर अविरोध निवडून आले.
तर उपसरपंचपदी सुरेखा गोडवे यांची वर्णी लागली. चिचपात्र ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ज्योती मुजमुले तर उपसरपंचपदी वासुदेव जाधव यांची निवड करण्यात आली. २२ पैकी १८ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे सरपंच निवडून आल्याचा दावा शिवसेना तालुका प्रमुख राजकुमार वानखडे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)