Mahavir Bhavan on Sunday | महावीर भवनाचे रविवारी लोकार्पण
महावीर भवनाचे रविवारी लोकार्पण

ठळक मुद्देखैरी येथे जय्यत तयारी : विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
खैरी : राळेगाव तालुक्यातील खैरी येथे धर्म आराधनेसाठी उभारण्यात आलेल्या महावीर भवनाचे लोकार्पण रविवार, १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. बाजार मंडीच्या प्रांगणात होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा राहतील.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी आदिवासी विकासमंत्री प्राचार्य डॉ. अशोक उईके, खासदार भावना गवळी, विधानसभेचे माजी उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, जिल्हा परिषद सदस्य प्रीतीताई काकडे, खैरीच्या सरपंच झोनिता मेश्राम, माजी खासदार नरेश पुगलिया, लोकमत यवतमाळ जिल्हा कार्यालय प्रमुख किशोर दर्डा, वडकीचे ठाणेदार प्रशांत गिते, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, प्रकाशचंद धारीवाल, आनंद ग्रुपचे बाळासाहेब धोका, जैन श्रावक संघ नागपूरचे माजी उपाध्यक्ष शांतीलाल झामड, नरेश मुथा, प्रकाशचंद मुथा, नवलचंदजी कोठारी, राळेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेशचंद झामड, नंदू गांधी आदी उपस्थित राहतील.
या कार्यक्रमानिमित्त सकाळी ७ वाजता प्रार्थना, ८ वाजता नवकारसी, १० वाजता स्वागत समारोह आणि म.सा. यांचे व्याख्यान होणार आहे. गायक विजय (बंटी) कोठारी व संच हिंगणघाट यांचे भक्तीसंगीत होणार आहे. जैन श्रावक संघ खैरी यांच्यातर्फे या संपूर्ण कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. आयोजनासाठी रमेशचंद झामड, धनराज झामड, मनोज कोचर आदी पुढाकार घेत आहेत.

Web Title: Mahavir Bhavan on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.