खैरी येथील महावीर भवन ही समाजासाठी मोठी उपलब्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 06:00 AM2019-11-18T06:00:00+5:302019-11-18T06:00:09+5:30

खैरीसारख्या छोट्याशा गावात भव्य असे महावीर भवन निर्माण झाले. ही समजासाठी मोठी उपलब्धी आहे. धार्मिक, अध्यात्मिक संस्कार आजही भारतीयांच्या मनात रुजलेले आहे, हे यावरून स्पष्ट होते. अध्यात्मिक विचारांची ही महाज्योत महानगरांतून छोट्या गावांपर्यंत प्रज्वलित झाली आहे. ती महाज्योत ज्ञान संस्काराने प्रत्येकाचे मन उजळून टाकत आहे, असे विचार लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.

Mahavir Bhavan in Khairi is a great achievement for the community | खैरी येथील महावीर भवन ही समाजासाठी मोठी उपलब्धी

खैरी येथील महावीर भवन ही समाजासाठी मोठी उपलब्धी

googlenewsNext
ठळक मुद्देविजय दर्डा : भवनाचे लोकार्पण, वीणादेवी दर्डा सभागृहाचे उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : खैरीसारख्या छोट्याशा गावात भव्य असे महावीर भवन निर्माण झाले. ही समजासाठी मोठी उपलब्धी आहे. धार्मिक, अध्यात्मिक संस्कार आजही भारतीयांच्या मनात रुजलेले आहे, हे यावरून स्पष्ट होते. अध्यात्मिक विचारांची ही महाज्योत महानगरांतून छोट्या गावांपर्यंत प्रज्वलित झाली आहे. ती महाज्योत ज्ञान संस्काराने प्रत्येकाचे मन उजळून टाकत आहे, असे विचार लोकमत मीडिया प्रा.लि.च्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार विजय दर्डा यांनी व्यक्त केले.
खैरी (ता. राळेगाव) येथे रविवारी विजय दर्डा यांच्या हस्ते महावीर भवनाचे लोकार्पण तसेच वीणादेवी जवाहरलाल दर्डा सभागृहाचे उद्घाटन झाले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. ते म्हणाले, खैरी येथे जैन धर्मीयांची लोकसंख्या अत्यल्प आहे. पण त्यांनी येथे महावीर भवन निर्माण करण्याचे ठरविले, त्यासाठी विविध ठिकाणच्या समाजबांधवांची मदत घेतली. आज हे भवन पूर्ण झाले. त्यात माझ्या आईच्या नावाने एक सभागृह बांधण्यात आले. त्यातून माझ्या आईच्या आठवणींना उजाळा मिळाला. या भवनासाठी मी खासदार निधीतून १० लाखांचा निधी दिला होता. मात्र स्थानिक ग्रामपंचायतीने भवनासाठी आवश्यक जागा दिली नाही. त्यामुळे तो निधी परत गेला, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
खैरी येथील जैन श्रावक संघाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ. अशोक उईके, खैरीच्या सरपंच झोनिता मेश्राम, ज्येष्ठ संपादक एस.एन.विनोद, जवाहरलाल दर्डा एज्युकेशन सोसायटीचे सचिव किशोर दर्डा, वडकीचे ठाणेदार प्रशांत गिते, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी, प्रकाशचंद धारीवाल, जैन श्रावक संघ नागपूरचे माजी उपाध्यक्ष शांतीलाल झामड, खैरी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष रमेश झामड, नरेश मुथा, प्रकाशचंद मुथा, नवलचंदजी कोठारी, सचिन कोठारी, विनोद नहार, राळेगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती सुरेशचंद झामड, नंदू गांधी आदी उपस्थित होते. (आणखी वृत्त/४)

खैरीच्या मातीशी जुनेच नाते
विजय दर्डा म्हणाले, खैरी गावाशी माझे जुनेच नाते आहे. या मातीसोबत माझा जिव्हाळा आहे. हे माझ्या आईच्या मामाजीचे गाव असल्याने बालपणाची काही काळ मी इथे घालविला आहे. आम्ही दमणीत, रेंगीत बसून यवतमाळवरून इथे यायचो. येथील धबधबा पाहण्याची मजाही काही औरच होती. म्हणून खैरीचे नाव निघाल्यावर आजही माझे मन बालपणात रममाण होते, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Mahavir Bhavan in Khairi is a great achievement for the community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.