कळंब येथे महावंदना व धम्मदेसना
By Admin | Updated: October 9, 2016 00:18 IST2016-10-09T00:18:11+5:302016-10-09T00:18:11+5:30
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात अखिल भारतीय भिक्खू संघ आणि फुले-आंबेडकरी साहित्य संसद ...

कळंब येथे महावंदना व धम्मदेसना
कळंब : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात अखिल भारतीय भिक्खू संघ आणि फुले-आंबेडकरी साहित्य संसद कळंबच्यावतीने महावंदना व धम्मदेसना कार्यक्रम घेण्यात आला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय भिक्खू संघाचे संघनायक भदंत सदानंद महाथेरो होते.
यावेळी सदानंद महाथेरो म्हणाले, मानवासाठी जेवढी अन्नाची आवश्यकता आहे, तेवढीच जीवन जगण्यासाठी धम्माची आवश्यकता आहे. धर्मात राहताना धर्माचे नियम व तत्व पाळली गेली पाहिजे. नाही तर धर्म लयास जातो. धर्मावर निष्ठा नसेल तर धर्माचे पतन होते. म्हणून धर्मातील लोकांनी जागृत राहून धर्म संरक्षण करण्याची गरज आहे. यावेळी प्रा.सुमेश बोधी व डॉ.ज्ञानदीप महाथेरो यांनी धम्मदेसना दिली.
या कार्यक्रमाचे संचालन सुगत नारायणे यांनी तर आभार प्रा.आर.जी. अंभोरे यांनी मानले. यावेळी फुले-आंबेडकरी साहित्य संसदचे अध्यक्ष किशोर भगत, भाविक भगत, सहायक पोलीस निरीक्षक संघरक्षक भगत, सुनील पडोळे, सुधाकर खैरकार, मुकुंद थारोत, अनिल तामगाडे, जयकुमार भवरे, भीमराव काळे, मधुकर खैरकार, अशोक गायकवाड, विजय थोरात, विजय बुरबुरे, सुधाकर ठोंबरे, देवकाबाई शंभरकर, लीला थोरात, वच्छला भेले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)