राजूर येथे गावकऱ्यांचे महाश्रमदान
By Admin | Updated: May 3, 2017 00:10 IST2017-05-03T00:10:21+5:302017-05-03T00:10:21+5:30
पाणी फाऊंडेशन वाटरकप स्पर्धेअंतर्गत राजूर येथे सोमवारी महाश्रमदान करण्यात आले. यात गावकऱ्यांसह इतर ठिकाणचे दोनशेवर स्वयंसेवक सहभागी झाले होते.

राजूर येथे गावकऱ्यांचे महाश्रमदान
कळंब : पाणी फाऊंडेशन वाटरकप स्पर्धेअंतर्गत राजूर येथे सोमवारी महाश्रमदान करण्यात आले. यात गावकऱ्यांसह इतर ठिकाणचे दोनशेवर स्वयंसेवक सहभागी झाले होते. प्रत्येक गावाला पाणीदार करण्यासाठी वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामांना प्रोत्साहित केले जात आहे. याच अनुषंगाने राजूर गावालगत जंगलात श्रमदान केले.
या महाश्रमदानात आमदार डॉ.अशोक उईके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख, जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती नंदिनी दरणे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बालु पाटील दरणे, पंचायत समिती सभापती संजीवनी कासार, उपसभापती महादेव काळे, तहसीलदार रणजित भोसले, गटविकास अधिकारी डॉ.मनोहर नाल्हे, सहायक गटविकास अधिकारी पद्माकर मडावी, वनपरिक्षेत्राधिकारी नितीन वानखडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यू.व्ही.राऊत, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता मनोहर शहारे, नायब तहसीलदार मंगेश होटे, शाखा अभियंता घोडेराव, शेंडे, तालुका कृषी अधिकारी के.बी. आठवले, मंडळ कृषी अधिकारी गुल्हाने यांच्यासह यवतमाळ, वणी, पुणे, कळंब आदी ठिकाणाहून स्वयंसेवकांनी श्रमदानात सहभाग घेतला. (तालुका प्रतिनिधी)