शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

Maharashtra Election 2019 ; सेना बंडखोर समर्थकांच्या घोषणाबाजीने नेते संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 06:00 IST

विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे.

ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : बंडखोर कुणालाच जुमानेना !

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभेच्या रणधुमाळीत उतरलेले राजकीय पक्षांचे बंडखोर आपल्या नेत्यांनाही जुमानत नसल्याचे चित्र नामांकन परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी यवतमाळात एका हॉटेलमध्ये पहायला मिळाले. सेना बंडखोराच्या समर्थकांनी चक्क आपल्या पक्षाच्या नेत्यासमोरच ‘अंगार-भंगार’ असे नारे दिल्याने हे नेते चांगलेच संतप्त झाले.विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेनेची युती आहे. सात पैकी एकमेव दिग्रस मतदारसंघात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आहे. बाकी सहा जागांवर भाजपचे उमेदवार लढत आहे. परंतु वणी, उमरखेड व यवतमाळ या तीन मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीच बंडाचे निशाण फडकविले आहे. त्यांचे बंड थंड करण्यात स्थानिक नेत्यांना अपयश आले. म्हणून खास ‘मातोश्री’च्या मर्जीतील संपर्क नेते अनिल देसाई यवतमाळात आले होते. परंतु त्यांचा आदेशही स्थानिक बंडखोरांच्या लेखी बेदखल ठरला. शिवसेना प्रमुखांच्या आदेशावर चालणारी शिवसेना आता ‘मातोश्री’च्या आदेशालाही जुमानत नसल्याने या शिवसैनिकांवरील नेत्यांची पकड सैल झाल्याचे मानले जाते.यवतमाळ विधानसभा मतदारसंघात गतवेळी भाजपला जोरदार टक्कर देणारे व निसटता पराभव स्वीकारावे लागलेले संतोष ढवळे यांनी बंडखोरी केली आहे. भाजपचे उमेदवार पालकमंत्री मदन येरावार यांच्यापुढे त्यांनी आव्हान उभे केले. युतीच्या हक्काच्या मतांमध्ये विभागनी होण्याची चिन्हे पाहता ढवळे यांना थांबविण्यासाठी जोरकस प्रयत्न झाले. शहरातील एका हॉटेलमध्ये भाजप-सेनेचे दोन्ही प्रमुख नेते व अन्य पदाधिकाऱ्यांची नामांकन परत घेण्याच्या दिवशी बैठक बोलविली. परंतु तेथे नेत्यांचे काही ऐक ऐकून घेण्याऐवजी ढवळेंच्या समर्थकांनी अंगार-भंगार असे नारे नेत्यांसमोरच लावले. ते पाहून ‘आतापर्यंत आपण ज्यांना ताकद देत होतो, ते आपल्या पक्षाचे निष्ठावंत पदाधिकारी हेच का’ यावर शिवसेनेच्या नेत्यांचा विश्वासच बसत नव्हता. या प्रकाराने सेनाच नव्हे तर भाजपचे उपस्थित प्रमुख दोन्ही नेते संतप्त झाले. परंतु त्यांनी निवडणूक असल्याने संताप आवरला. मात्र नेत्यांसमोर शिवसैनिकांनी केलेल्या या घोषणाबाजीची शिवसेनेत चांगलीच चर्चा आहे. शिवसेनेच्या बंडखोरांमुळे यवतमाळ, वणी, उमरखेड या तीन मतदारसंघातील भाजपच्या जागा धोक्यात आल्या आहे. भाजपमध्येही बंडखोरी झाली आहे. आर्णीमध्ये भाजपचे माजी आमदार पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरोधात दंड थोपटून आहे. त्याचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे. दिग्रस मतदारसंघातसुद्धा भाजपची बंडखोरी असली तरी सेनेला खरोखरच किती ‘मायनस’ करते याकडे जिल्ह्याच्या नजरा लागल्या आहेत.बंडखोरांवर होणार निलंबन कारवाईयवतमाळप्रमाणे वणी व उमरखेडचे शिवसेनेचे बंडखोरही पक्षादेशाला जुमाणण्यास तयार नाही. आपली ही शेवटची लढाई व अखेरची संधी म्हणून हे बंडखोर रिंंगणात उतरले आहे. सूत्रानुसार, मुंबईत बंडखोरांच्या विषयाच्या अनुषंगाने भाजप-शिवसेनेच्या प्रमुखांची लवकरच संयुक्त पत्रपरिषद होणार असून त्यात राज्यभरात पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध रिंगणात उतरलेल्या तमाम बंडखोरांना पक्षातून निलंबित करण्याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती आहे.

टॅग्स :yavatmal-acयवतमाळ