Maharashtra Election 2019 : पुसद मदारसंघात नाईक बंधूंमध्ये थेट लढत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 05:00 AM2019-10-08T05:00:00+5:302019-10-08T05:00:12+5:30

मतदारसंघात १९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. अखेरच्या क्षणी आठ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार उरले आहे. तथापि, खरी लढत मात्र भाजप-शिवसेना युतीचे अ‍ॅड.नीलय मधुकरराव नाईक आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्यातच होणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत नाईक घराण्याचा वरचष्मा राहिला आहे.

Maharashtra Election 2019 : Fighting directly between the Naik brothers in the Pusad constituency | Maharashtra Election 2019 : पुसद मदारसंघात नाईक बंधूंमध्ये थेट लढत

Maharashtra Election 2019 : पुसद मदारसंघात नाईक बंधूंमध्ये थेट लढत

Next
ठळक मुद्देरिंगणात ११ उमेदवार : आठ जणांनी घेतली माघार, इतर नऊ उमेदवारही स्पर्धेत

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : विधानसभा मतदारसंघात १९ पैकी आठ उमेदवारांनी माघार घेतली आहे. आता निवडणूक रिंगणात ११ उमेदवार उरले असून खरी लढत भाजपचे अ‍ॅड.निलय नाईक आणि राष्ट्रवादीचे इंद्रनील नाईक यांच्यातच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या मतदारसंघात १९ उमेदवारांनी नामांकन दाखल केले होते. अखेरच्या क्षणी आठ जणांनी रिंगणातून माघार घेतली. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ११ उमेदवार उरले आहे. तथापि, खरी लढत मात्र भाजप-शिवसेना युतीचे अ‍ॅड.नीलय मधुकरराव नाईक आणि राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार इंद्रनील मनोहरराव नाईक यांच्यातच होणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत नाईक घराण्याचा वरचष्मा राहिला आहे. नाईक यांचा बालेकिल्ला म्हणून अख्ख्या राज्यात हा मतदारसंघ परिचित आहे. दिवंगत वसंतराव नाईक, दिवंगत सुधाकरराव नाईक व मनोहरराव नाईक यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यावेळी विद्यमान आमदार मनोहरराव नाईक यांचे पुत्र इंद्रनील नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहे.
नाईक यांचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघात यावेळी भाजपने आमदार अ‍ॅड.निलय नाईक यांना उमेदवारी देवून निवडणुकीत रंगत आणली आहे. अ‍ॅड.निलय नाईक सध्या विधान परिषदेचे आमदार आहे. भाजपने त्यांनाच थेट मैदानात उतरविले.
या दोघांशिवाय रिंगणात इतर नऊ उमेदवार आहे. मात्र खरी लढत अ‍ॅड.निलय व इंद्रनील या दोन सख्ख्या चुलत भावांमध्येच रंगण्याची चिन्हे आहे. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही लढत लक्षवेधी ठरणार आहे.

संपूर्ण राज्याचे पुसद मतदारसंघाकडे लक्ष
पुसद विधानसभा मतदारसंघात यंदा प्रथमच नाईक घराण्यातील उमेदवार प्रतिस्पर्धी म्हणून समोरासमोर उभे ठाकले आहे. या मतदारसंघावर आतापर्यंत नाईक घराण्याचा वरचष्मा आहे. मात्र यावेळी प्रथमच नाईक घराण्यालाच झटका बसला आहे. मध्यंतरी पक्षांतराच्या चर्चेने या मतदारसंघात चर्चेचे गुºहाळ सुरू होते. आता या मतदारसंघात नाईक बंधूंमध्ये थेट लढत होणार असली तरी बसपा, वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचे उमेदवार किती मते घेतात याकडेही लक्ष लागले आहे.

Web Title: Maharashtra Election 2019 : Fighting directly between the Naik brothers in the Pusad constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.