Maharashtra Election 2019 ; काँग्रेसचे नेते पवारांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 06:00 AM2019-10-10T06:00:00+5:302019-10-10T06:00:07+5:30

मानोरा येथून शरद पवार यांचे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्णी रोड स्थित पक्ष कार्यालयात आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर, उमरखेडचे काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचले.

Maharashtra Election 2019 ; Congress leader visits Pawar | Maharashtra Election 2019 ; काँग्रेसचे नेते पवारांच्या भेटीला

Maharashtra Election 2019 ; काँग्रेसचे नेते पवारांच्या भेटीला

Next
ठळक मुद्देविधानसभा निवडणूक : काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना आशीर्वाद

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारयवतमाळात आले असता बुधवारी सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी त्यांची भेट घेतली. त्यांनीही आघाडीच्या या उमेदवारांना ‘विजयभव’ असा आशीर्वाद दिला.
मानोरा येथून शरद पवार यांचे सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आर्णी रोड स्थित पक्ष कार्यालयात आगमन झाले. यावेळी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार कीर्ती गांधी, यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस आघाडीचे उमेदवार बाळासाहेब मांगुळकर, उमरखेडचे काँग्रेसचे उमेदवार विजय खडसे पवारांच्या भेटीसाठी पोहोचले. काँग्रेस नेत्यांनी मांगुळकर, खडसे यांची ओळख करून दिली. पवारांनी त्यांना आशीर्वादही दिले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पुसद येथील उमेदवार इंद्रनील नाईक, दिग्रसचे उमेदवार मो.तारिक मो. शमी यांनीसुद्धा शरद पवारांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार ख्वाजा बेग, माजी खासदार सदाशिवराव ठाकरे, माजी आमदार संदीप बाजोरिया, सुभाष ठाकरे, चंद्रकांत ठाकरे, अ‍ॅड. आशिष देशमुख, क्रांती धोटे, मनीष पाटील, राजू पाटील, अशोकराव घारफळकर, उत्तमराव शेळके, राहूल ठाकरे तसेच काँग्रेस, राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रामुख्याने हजर होते.

पवारांचा मुक्काम
शरद पवार बुधवारी रात्री यवतमाळात मुक्कामी आहेत. गुरुवारी सकाळी कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन ते पुढच्या प्रवासाला निघणार आहे. बुधवारी रात्री ते विविध समाज संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Congress leader visits Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.