महागाव पोलिसांची देशी दारू अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:38 IST2021-05-01T04:38:33+5:302021-05-01T04:38:33+5:30

मुडाणा : महागाव पोलिसांनी शुक्रवारी सवना येथील दारू अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीनंतर आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली. ...

Mahagaon police raids local liquor den | महागाव पोलिसांची देशी दारू अड्ड्यावर धाड

महागाव पोलिसांची देशी दारू अड्ड्यावर धाड

मुडाणा : महागाव पोलिसांनी शुक्रवारी सवना येथील दारू अड्ड्यावर धाड टाकली. या धाडीनंतर आरोपीविरुद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाई प्रस्तावित केली.

सवना येथे गावठी दारु गाळून विक्री करणाऱ्यांच्या घरी धाड टाकण्यात आली. यात घर झडतीतून मुद्देमाल जप्त करण्यात आला. नागोराव तुकाराम धोत्रे (५०), दत्ता मारोती धोत्रे (४५), संतोष दुलाजी मिरे (३५), शांताराम सिंधू पवार (४०), साहेबराव लक्ष्मण पवार (३८), गंगूबाई मारोती याटेवाड (५०), साधना संतोष काळे (३५), अशी आरोपींची नावे आहे. त्यांच्याजवळून जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कारवाई ठाणेदार विलास चव्हाण, पीएसआय राहुल वानखडे, नारायण पवार, विलास राठोड, दिनेश आडे, संतोष जाधव, प्रमोद पवार, अर्जुन राठोड, अश्विनी उघडे, कोमल लभाने, विवेक पारडकर, होमगार्ड शिंदे, मोबीन आदींनी केली.

Web Title: Mahagaon police raids local liquor den