राळेगावच्या माधुरी नगराळे यांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:39 IST2021-03-28T04:39:13+5:302021-03-28T04:39:13+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, बांधकाम सभापती राम देवसरकर, स्वाती येंडे, मधुकर काठोळे, ...

Madhuri Nagarale of Ralegaon honored with District Teacher Award | राळेगावच्या माधुरी नगराळे यांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मान

राळेगावच्या माधुरी नगराळे यांचा जिल्हा शिक्षक पुरस्काराने सन्मान

जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, बांधकाम सभापती राम देवसरकर, स्वाती येंडे, मधुकर काठोळे, डाॅ. सतपाल सोवळे आदींच्या उपस्थितीत त्यांचा जिल्हा विशेष शिक्षक पुरस्काराने गौरव करण्यात आला. वर्षभर शाळा, वर्षभर दप्तरमुक्त शाळा, हस्ताक्षर सुधार प्रकल्प, अक्षरे निवडा-शब्द बनवा व त्यापासून वाक्य तयार करा, अंक निवडा-संख्या बनवा, लहान मोठेपण ठरवा, बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार करा आदी उपक्रम त्यांनी राबविले.

दैवत असलेले विद्यार्थी, कुटुंबीय, सहकारी, वेळोवेळी उपक्रमाची दखल घेणारे सर्व वरिष्ठ अधिकारी, यांच्यामुळेच हा जिल्हा विशेष शिक्षक पुरस्कार मिळाल्याचे माधुरी नगराळे यांनी सांगितले. हा पुरस्कार त्यांनी सर्वांना अर्पण केला. त्यांचे पती बबन नगराळे राळेगाव पंचायत समितीत केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

Web Title: Madhuri Nagarale of Ralegaon honored with District Teacher Award