मदन येरावारांकडे राज्य उत्पादन शुल्क खाते ?

By Admin | Updated: July 10, 2016 01:38 IST2016-07-10T01:38:56+5:302016-07-10T01:38:56+5:30

मंत्रिमंडळातील समावेशानंतर आमदार मदन येरावार यांच्याकडे नेमक्या कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाणार हे

Madan Yerawar has state excise duty account? | मदन येरावारांकडे राज्य उत्पादन शुल्क खाते ?

मदन येरावारांकडे राज्य उत्पादन शुल्क खाते ?

यवतमाळ : मंत्रिमंडळातील समावेशानंतर आमदार मदन येरावार यांच्याकडे नेमक्या कोणत्या खात्याची जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र राज्य उत्पादन शुल्क आणि सोबतीला नगरविकास किंवा सिंचन यांच्यापैकी एक खाते दिले जाणार असल्याची माहिती आहे.
ना. येरावारांना कोणते खाते मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. रात्री उशिरा खाते वाटपाची अधिकृत घोषणा होणार आहे. शपथविधीनंतर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिंचन व राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) खात्याचे सुतोवाच केले. ना. गिरीष महाजन यांनी त्यासाठी होकारही भरला आहे. शनिवारी मदन येरावार यांनी नागपुरात गडकरींची भेट घेतली. रविवारी ते यवतमाळात दाखल होणार असून त्यांच्या स्वागताची तयारी सुरू आहे.

४मदन येरावार यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याचे जवळजवळ निश्चित झाले होते. परंतु जानकर यांनी टोकाची भूमिका घेतल्याने अखेर त्यांंना कॅबिनेट देऊन येरावारांना राज्यमंत्रीपद देण्यात आले. यावेळी त्यांची कॅबिनेटची संधी हुकली.

Web Title: Madan Yerawar has state excise duty account?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.